इकराच्या शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:38+5:302021-07-16T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाच्या अंतर्गत इकरा शिक्षण संस्था, लोकमत व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाच्या अंतर्गत इकरा शिक्षण संस्था, लोकमत व एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मेहरूण येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५१ दात्यांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रेडक्रॉस सोसासटीच्या रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी इकरा शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, माजी प्राचार्य रऊफ शेख, डॉ. अमानुल्ला शाह, अमीन बादलीवाला, अब्दुल रशीद शेख, अब्दुल नबी बागबान, अजीज सालार, प्रा. जफर शेख, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, तारीक अन्वर, डॉ. कारी कदूस, डॉ. शोएब,मुफ्ती हारून नदवी, रिझवान फलाही, मेहरूणचे नगरसेवक हाजी युसुफ शेख, अक्रम देशमुख, निजाम पहेलवान, प्राचार्य जुबेर मलिक, मो. सलीम शाह, जमीर अश्रफ, अय्युब शेख यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू गवरे, उपप्राचार्य प्रा.आय.एम.पिंजारी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान, डॉ. शबाना खाटिक, प्रा. कहेकशा अंजुम, प्रा. फरहान शेख यांनी परिश्रम घेतले. इकरा शाहीन प्रायमरी स्कूल, इकरा शाहीन हायस्कूल व जुनिअर कॉलेज, इकरा डी.एड. कॉलेज, इकरा बी.एड. कॉलेज, इकरा युनानी मेडिकल कॉलेज, इकरा पब्लिक स्कूल, इकरा प्रताप नगर विद्यालय, इकरा सालार नगर हायस्कूल, इकरा आय. टी. आय.च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत अली यांनी मार्गदर्शन केले.
फोटो कॉप्शन
रक्तदात्यांसोबत उपस्थित अब्दुल हमीद जनाब, गनी मेमन, सैयद शुजाउत अली, अब्दुल अजिज सालार, अमीन भाई बादलीवाला, एजाज मलिक, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अब्दुल करीम सालार, डॉ. इकबाल शाह.