५३ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:28+5:302021-04-28T04:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गामुळे रक्त संकलन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गामुळे रक्त संकलन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर झाले. यात ५३ दात्यांनी रक्तदान केले.
सकाळी मंडळ क्र. ४ नंदनवन कॉलनीत जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्याहस्ते श्री हनुमान प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, नीलेश कुलकर्णी यांनी या शिबिराचे नियोजन केले. नगरसेविका दीपमाला काळे, धीरज वर्मा, ललित लोकचंदाणी यांनी रक्तदान करून सुरुवात केली. या प्रसंगी प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, विशाल पाटील, उपाध्यक्ष पिंटू काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, चेतन तिवारी, महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, जयंत चव्हाण, सागर पोळ आदी उपस्थित होते.
मंडळ क्र. ९ महाबळ स्टॉप, जाणता राजा चौक येथे रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी नितीन इंगळे, राहुल वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील, अमित सोळंकी, सुरसिंग पाटील, रवींद्र कोळी, संजय तिरमले, अनंत देसाई, प्रवीण मोहोर, पंकज सावळे, चेतन अदंगले, संतोष डांबरे, भुपेश कुलकर्णी, प्रथम पाटील, अशोक महाजन, रोहित सोनवणे, रुपेश मौर्य आदी उपस्थित होते. शिबिरास गोळवलकर रक्तपेढी, अविकुमार जोशी यांचे सहकार्य लाभले.