चोपडा येथे महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:56 PM2020-01-05T14:56:07+5:302020-01-05T14:57:36+5:30

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला.

A blood donation camp at Chopda | चोपडा येथे महारक्तदान शिबिर

चोपडा येथे महारक्तदान शिबिर

Next
ठळक मुद्दे२०७ बाटल्या रक्तसंचयचाळीसपेक्षा अधिक डॉक्टर्सनी केले रक्तदानअकरा जणांनी केला देहदानाचा संकल्प

संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : शहरातील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर नववर्षदिनी घेण्यात आले. या शिबिरात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला. यावेळी ११ जणांनी देहदानाचा संकल्प केला. विशेष म्हणजे शिबिरात चाळीसपेक्षा अधिक धन्वंतरींनी रक्तदान करून रक्तदानाचा मौलिक संदेश दिला.
नायब तहसीलदार महेंद्र साळुंखे, आय.डी.बी. आय.बँकचे शाखाधिकारी प्रेमसिंग सोलंकी, डॉ.दीपक चौधरी, डॉ.नरेंद्र शिरसाठ, नंदकिशोर सांगोरे, नगरसेविका अश्विनी गुजराथी, डॉ.कांचन टिल्लू, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.वैशाली पाटील, डॉ.निशात सय्यद, डॉ.एम.जी.पटेल, डॉ.एल.टी.पाटील, डॉ.जे.डी.चव्हाण, डॉ.हेमंत पाटील, डॉ.रवींद्र्र पाटील, डॉ.अनवर शेख, डॉ.वाल्मीक पाटील, डॉ.नीलेश महाजन, डॉ.केदार पाटील यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक धन्वंतरींनी रक्तदान केले.
यावेळी कांतीलाल पाटील, जुगलकिशोर पाटील, निवृत्ती पाटील, विजय पाटील, सुनील पाटील, जितेंद्र पाटील, भगवान पाटील, भरत पाटील यांच्यासह २०७ जणांनी महाशिबिरात रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला, तर संजय सूर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी, रणजितसिंग राजपूत, मनीषा पाटील, गुलाबराव देशमुख, सुनील पाटील, आनंदराव बाविस्कर, त्र्यंबक बारी, परमेश्वरी राजकुमार, हिलाल कुमावत, लक्ष्मण पाटील या अकरा जणांनी देहदानाचा संकल्प केला.
यावेळी यशोधन ट्रस्टच्या संचालिका डॉ.तृप्ती पाटील यांनी महाविद्यालयीन तरूणींच्या रक्तदानासाठी मार्गदर्शन केले. यात हर्षाली पाटील, रिया कलानी, माधुरी भदाणे, निवेदिता व श्रद्धा देशमुख आदी तरुणींनीदेखील रक्तदान केले. यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले. त्यांचे अनेकांनी अभीष्टचिंतन केले.
रक्तसंचय करणे कामी आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी, गोळवलकर गुरुजी रक्तपेढी जळगाव, रेडप्लस रक्तपेढी जळगाव व निर्णय जनसेवा रक्तपेढी धुळे यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वीतेसाठी नरेन्द्र पवार, दिनेश नाथबुवा, महेंद्र पाटील, बळीराम पावरा, संदीप पाटील, दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: A blood donation camp at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.