मणियार महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:52+5:302020-12-22T04:15:52+5:30
फोटो आहे.. शिंपी समाजात आदर्श विवाह जळगाव हर्षल खैरनार आणि अश्विनी सूर्यवंशी यांचा नुकताचा विवाह झाला. अश्विनीचा घटस्फोट झालेला ...
फोटो आहे..
शिंपी समाजात आदर्श विवाह
जळगाव हर्षल खैरनार आणि अश्विनी सूर्यवंशी यांचा नुकताचा विवाह झाला. अश्विनीचा घटस्फोट झालेला असून तीला एक सहा वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हर्षल हा अविनाश खैरनार यांचा मुलगा आहे.
४५ टक्के वसुली
जळगाव : विविध ग्रामपंचायतींकडून डिसेंबरपर्यंत केवळ ४५ टक्के कर वसुली झाली असून मार्चपर्यंत ही संख्या वाढण्याची ग्रामपंचायत विभागाला आशा आहे. कोरोनामुळे यंदा वसुलीवर परिणाम झाल्याची माहिती डेप्युटी सीईओ बाळासाहेब बोटे यांनी दिली.
निधी वापरास वाढीव मुदत
जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चीत निधीला मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन निवडून आलेल्यांना हा निधी विकास कामांना वापरता येणार आहे. त्यासाठी वेळ मात्र, दोन महिन्यांचाच मिळणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाचे दोन हफ्ते प्राप्त झालेले आहेत.
ग्रामसेवक पुरस्कार रखडले
जळगाव - जिल्हाभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कारच रखडले असून आता पुन्हा आचारसंहितेमुळे ते लांबणीवर पडले आहे. यासाठी ४५ नावेही अंतिम करण्यात आली आहेत. यंदा मात्र, याची आर्थीक तरतूद कमी करण्यात आल्याने हा पुरस्कार सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
रुग्ण वाढले
जळगाव - गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नॉन कोविड सुविधेत रुग्ण वाढलेले होते. सोमवारी २२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर साडे आठ महिन्यानंतर प्रथमच तीन मोठ्या शस्त्रक्रीयाही पार पडल्या.
बेशीस्त पार्कींग
जळगाव - जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये बेशीस्त वाहने पार्कींग केली जात असल्याने अन्य वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून पायी चालणेही कठीण होत असल्याचे चित्र असू याबाबत नियोजन करण्याची मागणी होत आहे.
४०५ शाळांना संरक्षण भींत
जळगाव : जिल्हाभरातील ४०५ शाळांना संरक्षण भींत बांधण्याचे काम पूर्ण झाले असून याबाबत शिक्षण समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. सभापती रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व आरोग्य समितीची सोमवारी सभा घेण्यात आली. मात्र, आचारसंहिता असल्याने या सभांमध्ये केवळ चर्चा करण्यात आल्या.
गर्दीवर नियंत्रण हवे
जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या स्थीर असली तरी कोरोना संपलेला नसून गर्दी करणे धोक्याचे ठरू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले असून त्या दृष्टीने प्रशासनाने बाजारपेठीतील, शासकीय कार्यलयांमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. शासकीय कार्यलयातील गर्दीवर नियंत्रण व त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.
शाळा सुस्थितीत
जळगाव : कोरोनानंतर सुरू झालेले ९ ते १२ वीचे वर्ग आता सुस्थितीत सुरू असून आता शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांची गरज नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरूवातीलाच शिक्षकांची चाचणी झालेली आहे. दरम्यान, सर्व नियम पाळले जात असल्याने शिवाय रुग्ण कमी असल्याने शाळांमध्ये कोरोनाची भीती नसल्याचे चित्र आहे.