सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:40+5:302021-05-19T04:16:40+5:30
सुभाष सुरवाडे यांची निवड जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद ...
सुभाष सुरवाडे यांची निवड
जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद अब्दुल सत्तार रंगरेज यांनी या निवडीचे पत्र दिले. या निवडीचे विविध मान्यवरांनी स्वागत केले.
स्कूल व्हॅनधारकांना आर्थिक मदत करा
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान रिक्षा, स्कूल व्हॅन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी यासह विविध मागण्या भाजप ॲटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीच्यावतीने करण्यात आल्या आहे. या विषयी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आघाडीचे महानगराध्यक्ष प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, संदीप वाणी, दिलीप वाघ, सुनील चौधरी, राजेश माळी, दीपक माळी, वसंत झुंजारराव, नाना वाणी, नारायण पाटील आदी उपस्थित होते.
जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील पद्मालय विश्राम गृह परिसरात अनियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी गटारीदेखील मोठ्या प्रमाणावर तुंबलेल्या आहेत. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहीम व जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्याची मागणी
जळगाव : मनपातर्फे गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने नियमित पाणी देण्यात आले. मात्र, कालांतराने पाणी देणे बंद झाल्याने, उन्हाळ्यात ही झाडे वाळू लागली आहेत. तरी मनाला प्रशासनाने उन्हाळ्यात या झाडांना नियमित पाणी देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वादळानंतर पुन्हा उकाडा
जळगाव : चक्रीवादळामुळे जळगावात रविवार व सोमवार असे दोन दिवस जोराने वारे वाहत आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तसेच यात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे काहीसा उकाडा दूर झाला होता. मात्र,मंगळवारी चक्रीवादळाचे वातावरण निवळल्यामुळे पुन्हा तापमानाचा पारा वाढून उकाडा निर्माण झाला होता.