लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:17 AM2021-07-26T04:17:00+5:302021-07-26T04:17:00+5:30
देशभरात एकच जात प्रमाणपत्र कायदा लागू करण्याची मागणी जळगाव : आदिवासी बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळण्यात अडचणी येत असून या ...
देशभरात एकच जात प्रमाणपत्र कायदा लागू करण्याची मागणी
जळगाव : आदिवासी बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळण्यात अडचणी येत असून या आरक्षणाच्या विषयात राज्य सरकारने हस्तक्षेप थांबवावा व केंद्राने संपूर्ण देशात एकच जात प्रमाणपत्र कायदा करावा अशी मागणी आदिवासी संघर्ष समितीच्यावतीने आमदार सुरेश भोळे यांच्याकडे करण्यात आली. या विषयी दिलेल्या निवेदन देण्यात आलेल्या निवेदनात राज्यतील जात प्रमाणपत्र कायदा २००१ ला स्थिगिती देण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. या वेळी आदिवासी संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली योगेश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे सुभाष कोळी, दीपक सोनवणे, सागर सोनवणे, विनोद कोळी, रजनी सोनवणे, आशा सपकाळे, रेखा सोनवणे, तुळशीराम सोनवणे, अभिमन कोळी, संतोष सोनवणे, रमेश कोळी, सुनील चौधरी, रमेश सोनार, हिलाल कोळी, निखिल सोनवणे, प्रभाकर तायडे, किशोर मोरे, संजय सपकाळे, बळीराम कोळी आदी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना आज साहित्य वाटप
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवार, २६ जुलै रोजी जळगाव शहर व चिंचोली येथे विविध कार्यक्रम होणार आहे. यामध्ये दुपारी चार वाजता लेवा भवन येथे दिव्यांह बांधवांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता चिंचोली येथे शिवसंपर्क अभियानास उपस्थित राहणार आहे.