लोकमतच्या हाकेला दिली रक्तदानाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:50+5:302021-07-05T04:12:50+5:30

बोदवड : लोकमतच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या नाते रक्ताचं या उपक्रमास आज बोदवडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमतचे संस्थापक संपादक ...

Blood donation was given in support of the referendum | लोकमतच्या हाकेला दिली रक्तदानाची साथ

लोकमतच्या हाकेला दिली रक्तदानाची साथ

Next

बोदवड : लोकमतच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या नाते रक्ताचं या उपक्रमास आज बोदवडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमतचे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व बोदवड येथील मोतीलाल माणकचंद अग्रवाल व अग्रवाल नवयुवक

मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा अग्रसेन भवनात महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी सकाळी नऊ ते दोन या वेळेत करण्यात आले होते. यात २५ जणांनी रक्तदान केले.

या उपक्रमाला सामाजिक, राजकीय, व्यापारी, नागरिक यांचे सहकार्य मिळाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिबिर स्थळी भेट देत लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि लोकमतने राज्यातील जनतेशी रक्ताचं नातं जोडल्याचे सांगितले,

शहरातील राष्ट्रवादीचे गट नेते देवेंद्र खेवलकर, भाजपचे गणेश शर्मा, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, तालुका सराफ असोसिएशनचे उमेश चोपडा, शैलेश भुतडा आदी तसेच अग्रवाल समाजाचे महामंत्री गोपाळ अग्रवाल, गुप्ता फाउंडेशनची राजेंद्र गुप्ता, अंकुर गुप्ता, अग्रवाल नवयुवक मंडळाचे रोहित अग्रवाल, संजय अग्रवाल, पवन अग्रवाल, निखिल अग्रवाल,राजस्थान मंडळाचे उपाध्यक्ष कल्पेश शर्मा, निखिल अग्रवाल, डॉ. अमोल शर्मा, गोपाळ व्यास आदी उपस्थित होते.

रक्त संकलन जळगाव येथील गोळवलकर रक्तपेढीकडून करण्यात आले. यासाठी जागृती लोहार, अर्जुन राठोड, श्रीकांत मुंडले यांनी मदत केली. काही रक्तदात्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

ए पॉझिटिव्ह

गौरव अग्रवाल,गोपाल परदेशी,अंकुर गुप्ता,सुनील गुप्ता, ओजस गुप्ता.

बी पॉझिटिव्ह

देवेंद्र खेवलकर,गणेश शर्मा, प्रीतम वर्मा, आशिष बडगुजर, अनिरुद्ध बडगुजर,

मयूर अग्रवाल.

बी निगेटिव्ह

शैलेश भुतडा.

ओ पॉझिटिव्ह

प्रदीप बडगुजर, उमेश चोपडा, धनराज सुतार, राहुल शर्मा, विकास तायडे, गोपाळ

व्यास, कल्पेश शर्मा, रोहित अग्रवाल, संजय अग्रवाल.

ओ निगेटिव्ह

विजय थांबेत.

Web Title: Blood donation was given in support of the referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.