विद्यापीठात २८ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:27+5:302021-07-07T04:21:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ होत ...

Blood donation was made by 28 donors in the university | विद्यापीठात २८ दात्यांनी केले रक्तदान

विद्यापीठात २८ दात्यांनी केले रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ होत आहे. मंगळवारी लोकमत व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी १० वाजता विद्यापीठात झालेल्या शिबिरात २८ बॅग रक्तसंकलन झाले.

याप्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव श्यामकांत भादलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, वित्त व लेखा अधिकारी सोमनाथ गोहील, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक किशोर पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, दीपक सोनवणे, सुभाष पवार, राजू सोनवणे, अरुण सपकाळे आदींची उपस्थिती होती. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. त्यात विद्यापीठातील २८ दात्यांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. लोकमतच्या महारक्तदान शिबिरात जळगावकरांनी तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.

यांनी केले रक्तदान

चंदन मोरे, गोपाल पाटील, हर्षल चौधरी, जितेंद्र पाटील, सागर नामदेव, सतीश कोळी, विनोद पाटील, दीपक दोडे, विशाल नन्नवरे, दीनेश कोळी, हर्षल चौधरी, कैलास पाटील, राजेंद्र बागुल, आकाश भामरे, विजय बोरसे, नरेंद्र पाटील, शरदचंद्र ठाकरे, सोनाली लोखंडे, अरुण सपकाळे, पंकज पाटील, शुभम सोनवणे, गंजीधर चौधरी, संतोष माळी, विजय बि-हाडे, सत्तार पटेल, विजय सूर्यवंशी, उज्ज्वल पाटील, डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी रक्तदान केले.

Web Title: Blood donation was made by 28 donors in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.