बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:23 PM2020-04-25T15:23:34+5:302020-04-25T15:24:41+5:30

लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 Blooming marigold flowers, trees uprooted due to lockdown | बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ।कोरोनाचा फुल शेतीला मोठा फटकातोडणीस आलेल्या फुलांचे मोठे नुकसानखरेदीदार मिळेना

चंद्रमणी इंगळे
हरताळा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा हरताळे शिवारात पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. फुलांची शेती चांगलीच बहरली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या झेंडूची फुले, झाडेच उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हरताळा शिवारातील गट नंबर ८०/१ मध्ये युवराज रामकृष्ण चोपडे यांनी एक एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. चांगला पाऊस आणि योग्य संगोपन यामुळे झेंडूचे पीक चांगलेच बहरले. मात्र तोडणीच्या वेळी लॉकडाऊनचा फटका या शेतकºयाला बसला आहे. सध्या कुणीही खरेदीदार मिळत नसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयाने सांगितले की, पाण्याची सुविधा असल्यामुळे फुल शेती यंदा चांगली बहरली. मात्र पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करीत असल्याने झेंडूची शेती चांगली बहरल्याने तोडणी गरजेची आहे. पण कुणी खरेदी करण्यास तयार नसल्याने फुले, झाडे उन्हामुळे सुकत असून, झाडेही उपटून फेकण्याची वेळ आली आहे. सुकलेली फुलदाणी उपटून फेकली. विशेष म्हणजे कोणतेही संकट आले तरी फुलांची विक्री बंद होत नव्हती. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे श्रीक्षेत्र मुक्ताई मंदिर, हरताळे मंदिर, चांगदेव महाराज मंदिर तसेच संस्थांना विक्री होणारी तसेच तालुक्यावरील वितरकांची फुल विक्रीची बंदी यामुळे सगळीकडील मागणी बंद झालेली आहे.
महत्वाचे म्हणजे भर उन्हाळ्यातील लग्न समारंभ, यात्रा, सत्यनारायण महापूजा, वास्तुशांती, जागरण गोंधळ, उद्घाटन, महापुरुष जयंती विशेष, सप्ताह आदी कार्यक्रम बंद आहेत. परिणामी फुले शेतातच खराब झाली. त्यामुळे सुरुवातीला खरीप व आता रब्बी हंगामापासूनही वंचित राहिल्याने व फुलशेतीनेही धोका दिल्याने चांगलीच कोंडी झाली आहे. यासाठी पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.


लॉकडाऊनमुळे फुल विक्री बंद आहे. परिसरातील सर्वच शेतकºयांची फुले शेतात पडून आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. फुल शेतीसाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. तसेच फुल शेतीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत व रब्बीचा हंगाम गेल्याने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे.
-युवराज रामकृष्ण चोपडे, शेतकरी, हरताळा, ता.मुक्ताईनगर



 

Web Title:  Blooming marigold flowers, trees uprooted due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.