उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव

By admin | Published: January 11, 2017 12:45 AM2017-01-11T00:45:32+5:302017-01-11T00:45:32+5:30

यावल नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करीत उघडय़ावर नैसर्गिक विधीस बसलेल्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Blossom: Gaurav by giving flowers to Gulab | उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव

उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव

Next


यावल : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनाअंतर्गत शहर हगणदरीमुक्त मोहिमेत  यावल  नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करीत उघडय़ावर  नैसर्गिक विधीस बसलेल्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
 या घटनेने उघडय़ावर  बसणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील आठवडय़ात मोहीम अधिक तीव्र करून कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी सांगितले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियांना अंतर्गत यावल  नगरपालिकेने  जानेवारी अखेर र्पयत शहर हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील  सात हजार 736 कुटुंबीयांपैकी  एक हजार 809 कुटुंबीयाकडे शौचालय नसल्याचे सव्रेक्षणात  आढळून आले आहे. त्यापैकी गेल्या वर्षभरात 533 शौचालये पूर्ण  करण्यात येऊन सध्या  689 शौचालयांची  कामे प्रगतीपथावर आहेत.
 उर्वरित 587 लोकांनी शौचालयांचे प्रस्ताव पालिकेकडे दाखल केले असल्याचे मुख्याधिकारी आढाव यांनी सांगितले.शौचालयांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे सांगत ज्यांच्याकडे जागा उपलब्ध  आहे. परंतु शौचालय नाही अशाकडे वारंवार पालिकेचे कर्मचारी जात आहेत.
दररोज नवीन  40-50 शौचालयाचे  कामे सुरू करीत असल्याचे आढाव यांनी सांगितले.   उघडय़ावर बसत असलेल्यांना वारंवार सांगूनही  ते ऐकत नसल्याने सध्या  त्यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्याचा पालिकेचा उपक्रम सुरू आहे. यानंतरही  नागरिकांनी ऐकले नाही तर त्यांना नोटिसा बजावण्यात येतील. शिवाय  कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. पालिकेकडून त्यांना कोणताही दाखला देण्यात येणार नाही. ही कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी आढाव यांनी  केले. 
(वार्ताहर)

Web Title: Blossom: Gaurav by giving flowers to Gulab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.