बेशिस्त वाहतुकीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:26+5:302021-04-02T04:16:26+5:30
जळगाव : शहरात सध्या सायंकाळी बाजारात मोठी गर्दी होते. या बेशिस्त वाहतुकीमुळे सायंकाळी पोलन पेठ, दाणा बाजार, सुभाष चौक ...
जळगाव : शहरात सध्या सायंकाळी बाजारात मोठी गर्दी होते. या बेशिस्त वाहतुकीमुळे सायंकाळी पोलन पेठ, दाणा बाजार, सुभाष चौक या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. तसेच या ठिकाणी असलेले पोलीस देखील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे.
भाजीबाजारात विक्रेत्यांची गर्दी कायम
जळगाव : शहरात भाजी बाजारात विक्रेत्यांना ओटे एक दिवसाआड देण्यात यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने देऊनदेखील अजून शहरातील विविध भाजीबाजारांमधील विक्रेत्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकदेखील खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
रस्त्यांचे डांबरीकरण करा
जळगाव : दादावाडी परिसरात आधीच महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असते. त्यात या परिसरातील काही रस्ते हे मातीचे असल्याने भर पडत आहे. हे रस्ते दुरुस्त करण्याची आणि डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणीच नाही.
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांत अनेक कर्मचारी आणि काही अधिकारीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान घेऊन तसेच त्याला हात स्वच्छ करायला लावून प्रवेश देणे अपेक्षित आहे. मात्र सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी होत नाही.
प्रशासकीय इमारतीत तपासणीची सोयच नाही
जळगाव : जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ मध्ये प्रवेशाच्या वेळी कोणत्याही प्रकारची तपासणी करण्याची सुविधा नाही. येथेदेखील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित होते. मात्र तरीदेखील अभ्यागतांची चौकशी आणि तपासणी करण्याची सुविधा येथे नाही. इमारतीत सहकार, कृषी, महिला व बालकल्याण यासारखी महत्त्वाचे विभाग आहेत.