अंघोळीचा बहाणा करुन युवकाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:13 PM2019-04-06T14:13:38+5:302019-04-06T14:14:11+5:30

कुसुंबा येथील घटना : कुटुंबियांसह मित्रंमडळींना बसला धक्का

Blow up the trousers and snatch the youth | अंघोळीचा बहाणा करुन युवकाचा गळफास

अंघोळीचा बहाणा करुन युवकाचा गळफास

Next


जळगाव : भाड्याच्या घराच्या शेजारीच सुरू असलेल्या स्वत:च्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी अंघोळ करण्याच्या बहाण्याने गेलेल्या किशोर पुना महाजन (वय२१) या तरूणाने नारळाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना शुक्रवारी सकाळी ९़३० वाजता घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
मुळचा धरणगाव येथील रहिवासी किशोर हा आई भिकुबाई यांच्यासह सहा ते सात वर्षापूर्वी कुसुंबा येथे वास्तव्यासाठी आला होता. त्यानंतर भाड्याचे घर घेऊन ते कुसुंबा गावात स्थायीक झाले़ वडील पुना नामदेव महाजन यांचा वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाल्यामुळे घरची जबाबदारी किशोरवर होती़ त्यामुळे जळगावातील रामेश्वर कॉलनीतील एका खाजगी ठिकाणी काम करून तो घरचा उदरनिर्वाह करीत होते़ मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तो घरी होता़ शुक्रवारी सकाळी जाग आल्यानंतर तो गावात दाढी करण्यासाठी गेला़ दरम्यान, वर्षभरापूर्वीच्या भाड्याच्या घराजवळ किशोरने एक प्लॉट विकत घेतला होता. त्याच ठिकाणी नवीन घराच्या बांधकामाचे काम सुरू होते़ घराच्या बांधकाम पुर्ण झालेले होते, मात्र किरकोळ कामे उरली होती़ सकाळी किशोर घरी परतल्यानंतर आई घरात स्वयंपाक करीत होती़ त्यावेळी त्याने आईला नवीन घराच्या बोरींगवर अंघोळ करून येतो सांगून शेजारीच असलेल्या नवीन घरात गेला़ त्याठिकाणी त्याने नारळाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़
मुलगा अजूनही अंघोळ करून आला नाही, म्हणून आई भिकूबाई या नवीन घरात त्यास पाहण्यासाठी गेल्या असता त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला़ आरडा-ओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली़ त्यानंतर किशोरला खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले़ त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. या ठिकाणी नातेवाईक व मित्रांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: Blow up the trousers and snatch the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.