निळ्या ध्वजांनी भुसावळ शहर सजले
By admin | Published: April 12, 2017 12:59 PM2017-04-12T12:59:58+5:302017-04-12T12:59:58+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी भुसावळ शहर निळे ध्वज, निळ्या पताका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टर , बॅनरने सजले आहे.
Next
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ठिकठिकाणी पोस्टर, बॅनरसह कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ,दि.12- डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणा:या 126 व्या जयंती सोहळ्यासाठी संपूर्ण भुसावळ शहर निळे ध्वज, निळ्या पताका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टर , बॅनरने सजले आहे.
खास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी गठीत करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक संतोष बारसे व संपूर्ण समितीच्यावतीने सर्वत्र पोस्टर बॅनर लावण्यात आले आहेत. या शिवाय शहरातील अनेकांनी जयंतीसाठी फलक लावले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर निळे झाले आहे.
विशेष करुन शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड (आरपीडी रोड), यावल रोड, जळगाव रोड, जामनेररोड, नाहाटा महाविद्यालय परीसर, खडका चौफुली, शिवाजीनगर, पंधरा बंगला, वसंत टॉकीज परीसर, रेल्वे लोखंडी पूल, रेल्वे स्थानक परीसर,बसस्थानक परीसरासह नगरपालिका कार्यालयामोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणचा परीसर निळ्या ध्वजांनी पूर्णपणे सजला आहे. जयंती निमित्त ठिकठिकाणी व्याख्यान, चर्चासत्र व ज्ञानदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे.