गोलाणीत साचलेल्या पाण्यात उतरल्या आमदार, खासदारांच्या बोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:31+5:302020-12-15T04:32:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात साचणाऱ्या पाण्यावर मनपाने कोणतीही उपाययोजना केलेली ...

Boats of MLAs and MPs descended into the stagnant water | गोलाणीत साचलेल्या पाण्यात उतरल्या आमदार, खासदारांच्या बोटी

गोलाणीत साचलेल्या पाण्यात उतरल्या आमदार, खासदारांच्या बोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात साचणाऱ्या पाण्यावर मनपाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सोमवारी शिवसेना महानगरच्यावतीने मार्केटच्या तळमजल्यात साचलेल्या पाण्यात आमदार, खासदार, महापौर, मनपा स्थायी समिती सभापती यांच्या नावाच्या

बोटी करून पाण्यात सोडण्यात आल्या, तसेच साचलेल्या पाण्याचे जलपूजन करत शिवसेनेने अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

या आंदोलनात मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे

उप-महानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, खुबचंद साहित्या, मंगला बारी, गोलाणी मार्केट शाखेचे अध्यक्ष पूनम राजपूत आदी उपस्थित होते.

महापालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर न झाल्याने त्या

साचलेल्या सांडपाण्यात ढोल-ताशाच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात आले.

कायमची समस्या, तोडगा मात्र नाही!

गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात अनेक महिन्यांपासून सांडपाणी साचत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपातील सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवक

विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी साचण्याची समस्या असून, उप-महापौर सुनील खडके हे पाहणी

दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत मंगला बारी यांनी अवगत करून दिले होते. गोलाणी मार्केटच्या पाइपलाइनमध्ये वारंवार घाण पाणी

अडकत असते. ती पाइपलाइन फार जुनी झाली असून, ती काढून तेथे नवीन पाइपलाइन बसविण्यात यावी, अशी मागणी भंगाळे यांनी केली, तसेच

महापालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

Web Title: Boats of MLAs and MPs descended into the stagnant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.