गोलाणीत साचलेल्या पाण्यात उतरल्या आमदार, खासदारांच्या बोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:44+5:302020-12-15T04:32:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात साचणाऱ्या पाण्यावर मनपाने कोणतीही उपाययोजना केलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात साचणाऱ्या पाण्यावर मनपाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सोमवारी शिवसेना महानगरच्या वतीने मार्केटच्या तळ मजल्यात साचलेल्या पाण्यात आमदार, खासदार, महापौर, मनपा स्थायी समिती सभापती यांच्या नावाच्या बोटी करून पाण्यात सोडण्यात आल्या तसेच साचलेल्या पाण्याचे जलपूजन करत शिवसेनेने अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
या आंदोलनात मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे उप-महानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, खुबचंद साहित्या, मंगला बारी, गोलाणी मार्केट शाखेचे अध्यक्ष पूनम राजपूत आदी उपस्थित होते.
महापालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर न झाल्याने त्या साचलेल्या सांडपाण्यात ढोल-ताशाच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात आले.