बोदवड व मुक्ताईनगर तालुक्याचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:08+5:302021-07-18T04:12:08+5:30

बोदवड शहरातील न. ह. रांका हायस्कूलचे ३६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व उत्तीर्ण झाले असून, पहिल्या ग्रेडमध्ये १४५, दुसऱ्या ...

Bodwad and Muktainagar taluka results are 100 percent | बोदवड व मुक्ताईनगर तालुक्याचा निकाल १०० टक्के

बोदवड व मुक्ताईनगर तालुक्याचा निकाल १०० टक्के

Next

बोदवड

शहरातील न. ह. रांका हायस्कूलचे ३६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व उत्तीर्ण झाले असून, पहिल्या ग्रेडमध्ये १४५, दुसऱ्या ग्रेडमध्ये १८३, तर तिसऱ्या ग्रेडमध्ये ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाचे १२७ पैकी पहिल्या ग्रेडमध्ये १६, दुसऱ्या ग्रेडमध्ये ६७, तिसऱ्या ग्रेडमध्ये ४३ उत्तीर्ण झाले.

चंद्रकांत हरी बढे हायस्कूलचे ७९ पैकी पहिल्या ग्रेडमध्ये ११, दुसऱ्या ग्रेडमध्ये ३२, तिसऱ्या ग्रेडमध्ये ३६ जण उत्तीर्ण झाले.

नाडगाव पाटील हायस्कूलचे ८५ पैकी १० विद्यार्थी पहिल्या ग्रेडमध्ये, ४७ दुसऱ्या ग्रेडमध्ये, तर २८ तिसऱ्या ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले.

गो.दे. ढाके विद्यालय एनगावचे ४० पैकी १३ पहिल्या ग्रेडमध्ये, १४ दुसऱ्या ग्रेडमध्ये, १३ तिसऱ्या ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले.

जामठी येथील चि. स. महाजन हायस्कूलचे १५७ पैकी १४ पहिल्या ग्रेडमध्ये, ५७ दुसऱ्या ग्रेडमध्ये, तर तिसऱ्या ग्रेडमध्ये ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण तालुक्यातील सर्वच शाळांची पहिल्या ग्रेडची टक्केवारी चांगली आहे.

मुक्ताईनगर

तालुक्‍यातील १६ शाळांतून २१०५ विद्यार्थ्यांपैकी सर्वचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शंभर टक्के निकाल पहिल्यांदाच लागलेला आहे.

रुईखेडा येथील नारखेडे विद्यालयात एकूण ५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी विशेष श्रेणीमधून उत्तीर्ण झाले, तर घाटे आनंदा शंकर उचंदा या शाळेतील १३० विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थी, तर पिंपरी नांदूर येथील नवीन माध्यमिक विद्यालयाचे ४८ पैकी ११, तर राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय कर्की येथील ११० विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी व अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे १५८ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी, इच्छापूर निमखेडी बुद्रुक येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील ६५ पैकी १२ विद्यार्थी, कुऱ्हा काकोडा येथील शिवाजी हायस्कूलचे २०५ पैकी २९, माध्यमिक आश्रमशाळा कुऱ्हा येथील १४४ पैकी ४३, जोंधनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेचे ३७ पैकी ३०, वडोदा येथील शिवाजी हायस्कूलचे ७३ पैकी २५, सुकळी येथील नवीन माध्यमिकचे ६५ पैकी २३, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयातील मुक्ताईनगर येथील ८९ पैकी १५, माध्यमिक आश्रमशाळा चारठाणा येथील ३३ पैकी १६, कोथळी येथील खडसे आश्रमशाळेतील ३२ पैकी १४ आणि आदर्श इंग्लिश मिडियम शाळेतील ५० पैकी ४२ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. याचबरोबर मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमधील ३८३ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थी, माध्यमिक कन्या विद्यालयातील ८, अल्फालाह उर्दू शाळेतील १०५ पैकी ३२, नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी खुर्द येथील २७ पैकी ८, चांगदेव येथील चौधरी हायस्कूलचे ८७ पैकी २९, हरताळे येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील ४१ पैकी ७, तर पूर्णामाई विद्यालय घोडेगाव येथील ११० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

रावेर

तालुक्यातील ५९ माध्यमिक शाळांचे ४ हजार २४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ४ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात १ हजार ८२४ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. २ हजार १६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २५१ विद्यार्थी द्वितीय, तर ४ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

५८ माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, एस.ए. जी. हायस्कूल सावदा या एकमेव शाळेचा निकाल ९६.७२ टक्के लागल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष जे. के. पाटील यांनी दिली.

Web Title: Bodwad and Muktainagar taluka results are 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.