बोडवडला ७४ वर्षात पहिल्यांदा फडकला नाही तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 10:32 PM2020-08-15T22:32:57+5:302020-08-15T22:38:31+5:30

बोदवड शहरात ७४ वर्षात पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला नाही.

Bodwad did not fly the tricolor for the first time in 74 years | बोडवडला ७४ वर्षात पहिल्यांदा फडकला नाही तिरंगा

बोडवडला ७४ वर्षात पहिल्यांदा फडकला नाही तिरंगा

Next
ठळक मुद्देप्रशासन, राजकीय उदासीनतानागरिकांची संतप्त प्रतिक्रिया


गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी जीवाचे रान केले, अक्षरशः बलिदान दिले; त्यांची आठवण करून देणाऱ्या व स्वातंत्र्याचे 'मोल' देणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे. मात्र याच दिनाचे विसमरण होण्याचा प्रकार बोदवड शहरात घडला. निमित्त होते स्वातंत्र्य दिनाचे.
बोदवड शहरातील गांधी चौकातील चौथऱ्यावर १९४७ पासून ते आजपावेतो नित्यनेमाने १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला न चुकता तिरंगा फडकवला जातो. यासाठी दरवर्षी ग्रामपंचायतीचे सरपंच ते नगरपंचायतीचे अध्यक्ष हे तिरंगा फडकवत गावात केलेल्या कार्याची तसेच पुढे करावयाची कामे तसेच इतर उपक्रमाची माहिती न चुकता ते देत असतात. त्या अनुषंगाने दरवर्षी या चौकात लागलेल्या हातगाड्या चालकही आपल्या तिरंग्यासाठी स्वतःहून गाड्या हटवून चौक व परिसर स्वच्छ करून देत असतात. परंतु यंदा बोदवड नगरपंचायतीकडून कोणत्याच ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्याची तयारी करण्यात आली नाही. तसेच या परिसराला स्वच्छही करण्यात आलेले नव्हते. सकाळी नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल डिस्टसिंग राखत, नागरिक पांढरा पोशाख परिधान करून गांधी चौकात आले. परंतु या ठिकाणी नगरपंचायतीकडून कोणत्याच प्रकारे स्वातंत्र्य दिनाची तयारी दिसली नाही. कोरोनाचे संकट समजून साधा राष्ट्रध्वजही का फडकवण्यात आला नाही, असा प्रश्न संतप्त शहरवासीय विचारत आहेत.
शहरात सर्व काही कोरोना काळातही सुरळीत सुरू असताना त्याला कोरोना आडवा येत नाही. निव्वळ स्वातंत्र्य दिनालाच कोरोना आडवा येतो का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Bodwad did not fly the tricolor for the first time in 74 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.