बोदवडला सवाऱ्यांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:11 PM2018-09-21T16:11:19+5:302018-09-21T16:14:44+5:30

बोदवडसह तालुका, जिल्हा आणि राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र मोहरमनिमित्त मोठा उल्हास आणि आनंदाचे वातावरण आहे.

Bodwad Raiders | बोदवडला सवाऱ्यांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

बोदवडला सवाऱ्यांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देबोदवडला मोहरमची प्रदीर्घ परंपराछडी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दीहजरत इमाम हसन हुसेन यांच्या आठवणींसाठी मातम

बोदवड, जि.जळगाव : सुमारे २००-२५० वर्षांची प्रदीर्घ धार्मिक परंपरा असलेल्या बोदवड येथील मोहरम पर्व उत्सवाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. दरम्यान, या उत्सवात संपूर्ण बोदवडसह तालुका, जिल्हा आणि राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र मोहरमनिमित्त मोठा उल्हास आणि आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मोहरम पर्वातील तिसºया दिवसाची गुरुवारची रात्र ही उर्दूमध्ये कत्तलची रात्र म्हणून संबोधली जाते. या रात्रीत हजरत इमाम हसन हुसेन यांच्या आठवणींसाठी मातम मनवले जाते. यानिमित्त संपूर्ण शहरात रात्री वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या सवाºया (छडी) ची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील आखाडा मोहल्ला भागात मोठा आलावा पेटवण्यात आला असून, या आलव्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
येथे रात्री संपूर्ण सवाºया मिरवणुकीने गोळा (एकत्र) झाल्या होत्या. हा सोहळा आणि रंगत याच देही याच डोळा पाहण्यासाठी शेकडो लोक बोदवडमधील रस्त्यांवर गोळा झाले होते.
मोहरम पर्वाच्या आजच्या आलावा मिरवणुकीसाठी आखाडा मोहल्ला भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यावरून टास्क फोर्सचे पथक दाखल झाले आहे. या भागाला छावणीचे रूप आले आहे.

Web Title: Bodwad Raiders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.