बोदवड तहसीलदार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:47+5:302021-05-29T04:13:47+5:30

बोदवड : कोरोना संक्रमण काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी तहसीलदार प्रथमेश घोलप स्वत: रस्त्यावर उतरले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ...

Bodwad tehsildar took to the streets | बोदवड तहसीलदार उतरले रस्त्यावर

बोदवड तहसीलदार उतरले रस्त्यावर

googlenewsNext

बोदवड : कोरोना संक्रमण काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी तहसीलदार प्रथमेश घोलप स्वत: रस्त्यावर उतरले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सकाळी ११ वाजेनंतर स्वतः तहसीलदार प्रथमेश घोलप, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी रस्त्यावर उतरत नाकाबंदी केली. वाहनचालकांची तपासणी केली. त्यात अनेकांकडे मास्क नसणे, ई-पास नसणे, तर या कारवाईदरम्यान त्यात शहरात एका दुकानदाराने ११ नंतरही व्यवसाय सुरू ठेवल्याने त्याला २० हजाराचा, तर तीन हातगाडीधारकांना प्रत्येकी एक हजाराचा, तर १४ नागरिकांवर मास्क नसणे, अशी कारवाई करण्यात आली.

बोदवड येथे नाकाबंदीच्या ठिकाणी स्वतः तहसीलदार प्रथमेश घोलप, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले हे ठाण मांडून होते.

Web Title: Bodwad tehsildar took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.