बोदवडला चोरीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:40+5:302021-05-29T04:13:40+5:30
बोदवड : शहरात गेल्या महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तूरडाळ चोरी आधी महिनाभरापूर्वी स्टेशन रोडवरील किराणा दुकानाच्या ...
बोदवड : शहरात गेल्या महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तूरडाळ चोरी आधी महिनाभरापूर्वी स्टेशन रोडवरील किराणा दुकानाच्या बाहेर असलेल्या तेलाच्या तीन टाक्या चोरीस गेल्या गेल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी मनूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक नळ्याही चोरटे घेऊन पसार झाले होते.
तीर्थक्षेत्र विकासासाठी
एक कोटीचा निधी
चाळीसगाव : तालुक्यात तीर्थक्षेत्र विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित विकासकामांसाठी शासनाकडून विकासाची अपेक्षा आहे, अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
वाळू वाहतुकीवरून
पोलिसांनी मिटविला वाद
अमळनेर : पांझरा व तापी नदीकिनारी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ग्रामस्थांनी पकडली. त्यावेळी ग्रामस्थ व वाळू वाहतूकदार यांच्यात वाद झाले. घटनास्थळी मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर वेळीच पोहोचल्याने वाद मिटला.