बोदवडचा मद्यपी पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:13 IST2020-08-08T22:13:35+5:302020-08-08T22:13:52+5:30
पो.काँ.विनोद रामशंकर सोनवणे या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.

बोदवडचा मद्यपी पोलीस निलंबित
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील घाणखेडा येथे सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पो.काँ.विनोद रामशंकर सोनवणे या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.
४ रोजी मध्यरात्री गस्तीवर असताना या पोलीस कर्मचाºयाने अंगातील कपडे काढून नग्नावस्थेत गावात धिंगाणा घातला होता. याप्रकरणी शनिवारी या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.