बोदवडचा टांगा व्यवसाय इतिहासजमा होण्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:15 PM2020-01-18T15:15:17+5:302020-01-18T15:15:23+5:30

ब्रिटीश काळापासूनची ‘ओळख’ जपताय चार-पाचच जण

Bodwad's leg to become a business history collector | बोदवडचा टांगा व्यवसाय इतिहासजमा होण्याकडे

बोदवडचा टांगा व्यवसाय इतिहासजमा होण्याकडे

googlenewsNext


गोपाल व्यास ।
बोदवड : शहरात ब्रिटिशकाळापासून टांगे चालत असल्याने या ठिकाणी घोडागाडी ही एक ओळख निर्माण झाली होती. बोदवडची त्याकाळी कापड व्यवसायाची बाजारपेठ ही घोडागाडी माल वाहतुकीसाठी टांग्यांवरच अवलंबून होती, आज मात्र ही विशेष ओळख इतर वाहने आल्याने इतिहास जमा होण्यावर आहे.
सन १९२७ मध्ये बोदवड रेल्वेच्या स्थानकांवर ब्रिटिश शासन असताना नागपूर मुंबई -एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्याचे थांबे होते. सदरच्या गाड्यांनी अनेक प्रवासी ये-जा करीत. त्यामुळे त्याकाळी स्टेशन ते बोदवड गावात येण्यासाठी प्रवाशांना बसेस तसेच दळणवळणाची ईतर साधने नसल्याने नागरिक घोडागाडीचा वापर करीत असत.
यासाठी दररोज ऐंशीच्या जवळपास घोडागाड्या बोदवड शहरात होत्या. वरणगावचा तसेच बोदवडचा बाजार यासाठीही त्याकाळी टांग्याचा वापर होत असे.
आजूबाजूच्या गावातून नागरिक स्टेशन पर्यंत पायी येत व स्टेशन वरून घोडागाडीने बोदवडला येत. तसेच जळगाव व इतर ठिकाणीच्या सूत गिरण्यांच्या खादी कापडाचे तागे हे बोदवड रेल्वे स्थानकवर उतरत व टांग्यानी हे कापड बोदवडच्या कापड व्यावसाईक पोहोच होत असे.
अगदी सुरुवातीला बोदवड ते नाडगावसाठी सर्वप्रथम टांगे हे उखरडू महाजन, नारायण शिकारी आदींचे होते.
सुरुवातीस होते एकआणा भाडे
त्यावेळेस अगदी सुरुवातील एक आणा प्रती प्रवासी भाडे होते. त्यानंतर काळानुसार भाडे वाढत जाऊन दहा पैसे, चार आणे, एक रुपया प्रती प्रवासी असे भाडे आकारले गेले. सध्या हा दर दहा रुपये असा आहे. तर त्या काळी वीज नसल्याने घोडागाडीवर रॉकेल चे कंदील लावलेले असत. बोदवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ टांगा स्टँड होता व आज ही जुने जाणते या चौकाला टांगा स्टँड म्हणून ओळखतात.
टांग्यानाही मिळत होते परवाने
त्याकाळात असलेल्या टांग्याना जळगाव उपविभागीय कार्यालय कडून परवाना मिळत होता. त्यासाठी सर्व टांगे हे बोदवडला सजवून रांगेतकेले जात होते. जो टांगा सर्वाधिक चांगला त्याला पहिला क्रमांक. याप्रमाणे टांग्याना क्रमांक दिले जात होते,
हक्काची जागा मिळावी
बोदवड ला असलेला टांगा स्टँड आता नगरपंच्यात झाल्यापासून तेथून हटविण्यात आला असून,त्यांना हक्काची जागा हवी अशी मागणी टांगा चालक मालक संघटनेची आहे. सन १९६४पासून आजतागायत चार आणे भाडे आकारून टांगा हाकणारे देवराव कºहाडे हे आजही हा व्यवसाय जोपासत असून त्यांनी सांगितले की, आम्हाला बोदवड शहरात टांगे लावण्यास जागा मिळत नाही व आमच्या पूर्वीपासूनच्या हक्कच्या जागेवर आम्हाला उभे राहू दिले जात नसल्याने आम्ही टांगा चालक मालक संघटनेकडून सुधीर पाटील, शे उस्मान शे मेहमूद, कैलास फाटे, उत्तम माळी आदींनी निवेदन दिले असून आम्हाला किमान दोन टांगे उभे राहतील अशी जागा मिळावी ही मागणी आहे.

Web Title: Bodwad's leg to become a business history collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.