बोदवडला लंपास केला दारुचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 18:11 IST2020-07-28T18:09:59+5:302020-07-28T18:11:25+5:30
बोदवड : शहरातील चोरीच्या घटनांचा आलेख काही केल्या कमी होण्यास तयार नसून येथील एक दारु दुकान फोडून चोरट्यांनी २५ ...

बोदवडला लंपास केला दारुचा साठा
बोदवड : शहरातील चोरीच्या घटनांचा आलेख काही केल्या कमी होण्यास तयार नसून येथील एक दारु दुकान फोडून चोरट्यांनी २५ हजाराचे मद्य लंपास केले आहे. या महिनाभरातच चोरीची ही चौथी घटना आहे.
शहरातील मलकापूर रस्त्यावर पी. एस. खत्री यांचे किरकोळ दारू विक्रीचे दुकान असून या दुकानात चोरट्यांनी दुकांचे शेटर तोडून आत प्रवेश करीत दुकानातील े देशी दारूच्या बाटल्या तसेच दुकानात लावलेले सीसीसीटीव्ही कॅमेरे, त्याच प्रमाणे डिव्हीआर असा एकूण सव्वीस हजार नऊशे वीस रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत नारायण मोहनसिंग पाटील यांच्या फियार्दीवरून बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्ग धास्तावला आहे. या महिन्यात वर्षभरात सर्वात जास्त प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असून विशेष म्हणजे शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानांना चोरटे लक्ष करीत आहे. दर चार दिवस आड चोरीची ही चौथी घटना घडली आहे. विशेष करून शहरातील सर्व चोरीच्या घटनेत एकाच पद्धतीने दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडण्यात आले आहे.