जळगाव येथे नववर्षात वाहतूक पोलिसांकडे बॉडी कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:47 PM2017-12-30T12:47:52+5:302017-12-30T12:52:03+5:30
पोलीस अधीक्षकांची माहिती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांनी वाहन अडविले असता नागरिक व कर्मचा:यांमध्ये वाद होतात. अनेकदा वादाचे पर्यवसन हाणामारीत होते, या घटनांच्या पाश्र्वभूमीवर नवीन वर्षात वाहतूक पोलिसांच्या अंगावर बॉडी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली़
शहरातील वाहतूक कोंडीची अडचण, महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना या पाश्र्वभूमिवर कराळे यांनी गुरुवारी रात्री वाहतूक पोलिसांची हजेरी घेतली़ यावेळी झालेल्या बैठकीत आवश्यक उपाय योजनांबाबतही अधिका:यांसोबत चर्चा करण्यात आली़ ब:याच वेळा महामार्गावर किंवा शहरातील प्रमुख चौकात सिग्नल तोडणारे वाहनधारक, ट्रिपलसिट तसेच सुसाटवेगात वाहन पळविणा:यांना जाब विचारणा:या पोलिसांवरच आरोप करून वादाला तोंड फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या गोष्टी लक्षात घेत नवीन वर्षात वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीला 10 कॅमेरे खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
वाहतूक पोलीस फैलावर
काही वाहतूक पोलीस डय़ुटीवर येतात, मात्र जबाबदारी नेमून दिलेल्या पॉईंटवर थांबत नाही, तसेच दंड आकारणी जास्त तसेच केसेस कमी असल्याने त्यांनी प्रत्येक कर्मचा:याने 2016-17 मध्ये केलेल्या केससची आकडेवारी जाणून घेतली.
कारवाईचा इशारा
प्रमुख चौक, बस स्थानक परिसरात वाहनांची नेहमी कोंडी होत असते. याबाबत सूचना देऊन व तक्रारी असताना दुर्लक्ष केले जाते. ही बाब आता गांभीर्याने घेतली जाईल, असा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिला व अधिका:यांना सूचनाही दिल्या जातील असे सांगितले.
ट्रॅफिक पार्क साकारणार
शहरात वाहनतळ, एकदिशा मार्ग, या संदर्भात सूचना तसेच हरकती मागविण्यात आल्या होत्या. अद्याप कोणाकडून सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परंतु या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून नवीन वर्षात ट्रॅफिक पार्कही साकारण्यात येणार आह़े त्यासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा सुरु असून निधीसाठी जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रस्ताव दिला जाणार आह़े त्याचप्रकारे काही वाहतूक कर्मचा:यांनी साथीच्या आजारांच्या पाश्र्वभूमिवर मॉस्कची मागणी आह़े त्यानुसार 206 मॉस्कही दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.