घातपाताच्या संशयावरून मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 01:05 PM2017-07-08T13:05:55+5:302017-07-08T13:05:55+5:30

निवृत्त मिल कामगार कैलास सुपडू पाटील यांचा मृतदेह टेकवाडे शिवारात गोसावी यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत 6 रोजी आढळून आला होता.

The body of the deceased directly in the police station on suspicion of assault | घातपाताच्या संशयावरून मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

घातपाताच्या संशयावरून मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

Next

 ऑनलाईन लोकमत

 
चाळीसगाव, जि. जळगाव, दि.8 -  ओझर येथील निवृत्त मिल कामगार कैलास सुपडू पाटील यांचा मृतदेह टेकवाडे शिवारात गोसावी  यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत 6 रोजी आढळून आला होता. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आत्महत्या व आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मयत कैलास सुपडू पाटील यांच्या सैन्यात   असलेल्या दोघे मुलांनी मृतदेह पाहिला असता त्यांना तो घातपाताचा प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी शनिवारी थेट मृतदेह घेऊन  चाळीसगाव पोलीस स्टेशन गाठले  व  आमच्या वडिलांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवावा, अन्यथा   मृतदेह घेऊन जाणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे पोलीस ठाण्यात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली.  सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला नातवाईकांची मोठी गर्दी जमली होती.  
प्रथम मृतदेह अप्पर पोलीस कार्यालयात नेण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे शिर्डी येथे  गेले असल्याने नातेवाईकांनी शेवटी शहर पोलीस स्टेशन गाठले. यावेळी डिवायएसपी अरविंद पाटील,  पो. नि. रामेश्वर गाडे पाटील यांनी जमावाचे म्हणणे ऐकून घेतले.

Web Title: The body of the deceased directly in the police station on suspicion of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.