भुसावळ पालिकेचे रुग्णालय टाकतेय कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:57 PM2017-06-10T12:57:17+5:302017-06-10T12:57:17+5:30
तज्ज्ञ स्त्री व बालरोग तज्ज्ञाची नेमणूक पालिकेच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आल्याने
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 10 - पालिकेच्या दवाखान्यात कुठल्याही सुविधा मिळत नाही, अशी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांची असलेली ओरड यापुढे थांबणार आह़े पालिका रुग्णालयात पुरेसा औषधसाठा तसेच रॅबीजसह अन्य लसींचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला असून तज्ज्ञ स्त्री व बालरोग तज्ज्ञाची नेमणूक पालिकेच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठाच दिलासा मिळाला आह़े पालिकेचे रुग्णालयाने कात टाकण्यास सुरुवात केली आह़े
शहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टर दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत यावल रोड, खडका रोड, बद्री प्लॉट, महात्मा फुले नगरातील आरोग्य केंद्रात दोन तास सेवा बजावणार आहेत़ गरजू रुग्णांना महागडय़ा दवाखान्यात जाण्याची त्यामुळे यापुढे आवश्यकता भासणार नाही़
सोमवारी खडका रोडवरील केंद्रात डॉ़दीपा रत्नानी, मंगळवारी यावल रोडवरील केंद्रात डॉ़समीर खानापूरकर तर बुधवारी यावल रोडवरील ऩपा़दवाखान्यात डॉ़दीपाली पाटील तर गुरुवारी बद्री प्लॉटमध्ये डॉ़शीतल चौधरी तर महात्मा फुले नगरात डॉ़दीप्ती चौधरी, शुक्रवारी खडका रोडवरील डॉ़समीर खानापूरकर तसेच याच दिवशी बद्री प्लॉटमध्ये डॉ़अवनी ढाके सेवा देतील तसेच सकाळी दहा ते एक या वेळेत डॉ़अनंत बेंडाळे सेवा बजावतील़
दरम्यान, आरोग्य सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य समिती सभापती दीपाली ब:हाटे, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांनी केले आह़े