बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला १६ तासांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 04:56 PM2020-07-20T16:56:17+5:302020-07-20T16:58:10+5:30
तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह तब्बल १६ तासांनी म्हणजे सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. पाण्यात फुगून तरंगत वर आल्याने गावकºयांच्या निदर्शनास आला. दरम्यान, चेतनच्या मृत्यूविषयी कुटुंबाने शंका निर्माण केली आहे, त्यामुळे शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
जळगाव : तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह तब्बल १६ तासांनी म्हणजे सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. पाण्यात फुगून तरंगत वर आल्याने गावकºयांच्या निदर्शनास आला. दरम्यान, चेतनच्या मृत्यूविषयी कुटुंबाने शंका निर्माण केली आहे, त्यामुळे शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
कातांई बंधाºयात रविवारी दुपारी साडे तीन वाजता पाय निसटल्याने चेतन अरुण पाथरवट व सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) हे दोन तरुण बुडाले होते. त्यात सागर याला वाचविण्यात यश आले होते तर चेतन बेपत्ताच होता. पट्टीच्या पोहणाºयांमार्फत त्याचा शोध घेण्यात आला होता, मात्र तरीही तो न सापडल्याने रात्री आठ वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळी ७.३० वाजता घटनास्थळापासून काही अंतरावर चेतनचा मृतदेह फुगून पाण्याच्यावर आलेला होता. तेथे १५ फूट खोल खड्डा होता. तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हळणोर व सहकाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. दुपारी दोन वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कुटुंबाचा आक्षेप
चेतन याच्या मृत्यूबाबत कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. सहायक निरीक्षक गणेश चव्हाण यांनी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत घातली. तरीही आक्षेपामुळे मृत्यूचे मुळ कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला असून तो प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन हा गेल्या काही दिवसांपूर्वीच बॅँक आॅफ महाराष्ट्रमध्ये कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता.