बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 07:44 PM2020-07-22T19:44:37+5:302020-07-22T19:47:56+5:30

एमआयडीसीतील नितीन साहित्या नगरातून बेपत्ता झालेल्या अमोल अधिकार पाटील (२०) या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी याच परिसरातील गाडगे तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अमोलची आत्महत्या आहे की तो बुडाला किंवा काही घातपाताचा प्रकार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

The body of a missing youth was found in a pond | बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला तलावात

बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला तलावात

Next
ठळक मुद्देरहस्य कायम एमआयडीसीतील घटना

जळगाव : एमआयडीसीतील नितीन साहित्या नगरातून बेपत्ता झालेल्या अमोल अधिकार पाटील (२०) या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी याच परिसरातील गाडगे तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अमोलची आत्महत्या आहे की तो बुडाला किंवा काही घातपाताचा प्रकार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमोल अधिकार पाटील (रा. नितीन साहित्या नगर), हा आई चंद्रकला पाटील यांच्यासह राहतो. एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. २० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अमोल घरातून गेला तर परत आलाच नाही. आईने नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. त्यामुळे २१ रोजी आई चंद्रकला पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अमोल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. बुधवारी सकाळी नितीन साहित्या नगरजवळ असलेल्या एका तलावात अमोलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बेपत्ता झालेल्या अमोलचाच असल्याचे ओळखले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a missing youth was found in a pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.