बिबटय़ाच्या हल्यात ठार झालेल्या वरखेडे येथील महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:06 PM2017-11-16T12:06:44+5:302017-11-16T12:15:50+5:30

प्रशासनाला धरले धारेवर : उपाययोजनांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

The body of a woman was found in the police station | बिबटय़ाच्या हल्यात ठार झालेल्या वरखेडे येथील महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात

बिबटय़ाच्या हल्यात ठार झालेल्या वरखेडे येथील महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात

Next
ठळक मुद्देउपाययोजनांचे अश्वासनग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 16 - बुधवारी वरखेडे येथील दीपाली नारायण जगताप ही 25 वर्षीय महिला नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाली. गुरुवारी सकाळी 10 वाजता  तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी प्रशासनाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. बिबटय़ाचा बंदोबस्त कधी करणार? अजून किती बळी घेणार? भारनियमन बंद करणार की नाही ? अशा प्रश्नांचा भडीमार केला. यामुळे तहसील कार्यालय परिसरात कार्यकत्र्यांची मोठी गर्दी झाली होती. 
कार्यकत्र्यांनी ठिय्या देऊन वानविभागाला जाब विचारला. बिबटय़ाला जेरबंद केल्याशिवाय मृतदेह येथून हलविणार नाही. अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी चाळीसगाव वन्यजीव विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रय} केला. ठोस अश्वासन द्या, बिबटय़ाला जेरबंद करा. या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दीपाली जगताप यांचे नातेवाईक, वरखेडे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, सूर्यकांत ठाकूर,  पं.स.चे राष्ट्रवादी गटनेते अजय पाटील, दीपक पाटील, जगदीश चौधरी यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, अॅड. रोहिदास पाटील, काशिनाथ गायकवाड, संजय ठाकरे,  काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांनी आंदोलन करुन संतप्त मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी आंदोलकांची बाजू ऐंकून घेऊन कारवाई करण्याचे अश्वासन दिले.
उपाययोजनांचे अश्वासन
यावेळी प्रांताधिकारी शरद पवार यांनी भ्रमणध्वानीवरुन उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी चर्चा करुन आंदोलकांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागामार्फत सात पिंजरे, ड्रोन कॅमेरे यासह कर्मचा-यांची कुमक वाढण्याचे ठोस अश्वासन रेड्डी यांनी दिले. वनविभागाचे संजय मोरे यांनी देखील वरखेडे सरपंचांना कारवाई करण्याबाबत लेखी अश्वासन दिल्यानंतर तासाभराने आंदोलन स्थगित करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांनी अखेर ताब्यात घेतले.
 

Web Title: The body of a woman was found in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.