जळगावात रुळावर तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्येचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:40 PM2018-01-23T12:40:44+5:302018-01-23T12:44:30+5:30
तरुणाच्या हातावर रुपाली-इंद्रा नाव
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- काशिनाथ पलोड स्कूलजवळून गेलेल्या मध्य रेल्वेच्या रुळावर सोमवारी सकाळी साडे सात वाजता एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आला. एक ते दीड कि.मी.र्पयत दोन्ही मृतदेह रेल्वेने फरफटत आल्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाटले असून चेहरे छिन्नविछिन्न असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेतील तरुणाचे वय 25 ते 26 व तरुणीचे वय 18 ते 20 या दरम्यान आहे. हे तरुण-तरुणी विवाहिती की अविवाहित हे देखील स्पष्ट झालेले नाही.
प्रेमप्रकरणातून किंवा अन्य कारणातून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. याशिवाय हा खूनाचा तर प्रकार नाही ना? या संशयावरही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारगृहात ठेवण्यात आले आहेत.
एक कि.मी.र्पयत कपडय़ांचा शोध
दोघांच्या अंगावर कपडे नसल्याने तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे व उमेश भांडारकर यांनी रेल्वे रुळावर दोन्ही बाजुंनी एक कि.मी.र्पयत पाहणी केली. ओळख पटविण्यासाठी कपडे किंवा काही वस्तू मिळते का म्हणून दोन्ही कर्मचा:यांनी परिसर पिंजून काढला, मात्र काहीच वस्तू व पुरावा मिळाला नाही. त्यामुळे या दोघांचे मृतदेह नऊ वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली.
हातावरच्या नावावरुन शोध सुरु
तरुणाच्या उजव्या हातावर रुपाली व इंद्रा असे गोंधलेले आहे. त्यामुळे तरुणीचे नाव रुपाली व तरुणाचे नाव इंद्र असावे अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. नावावरुन तरी हे तरुण-तरुणी महाराष्ट्रातीलच असावे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणत्या पोलीस स्टेशनला तरुण व तरुणीची हरविल्याची किंवा अपहरणाची तक्रार दाखल आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
10 तासापूर्वीची घटना
मृतदेहाची अवस्था पाहता ही घटना दहा तास आधी घडलेली असावी. दोघांचे मृतदेह काळे पडले आहेत. दरुगधी मात्र येत नव्हती. खांब क्रमांक 413/28 जवळ हे मृतदेह आढळून आले. दोघांच्याही चेह:याला जबर मार लागला आहे. त्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले आहे.