जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जळगाव केंद्रावर बोगस मतदान? उमेदवारांकडून आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:08 PM2023-04-28T15:08:12+5:302023-04-28T15:08:52+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-मापाडी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार, देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे यांनी केला.

Bogus voting at Jalgaon Center for Jalgaon Agricultural Produce Market Committee? Objections by candidates | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जळगाव केंद्रावर बोगस मतदान? उमेदवारांकडून आक्षेप

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जळगाव केंद्रावर बोगस मतदान? उमेदवारांकडून आक्षेप

googlenewsNext

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, जळगाव बाजार समितीसाठी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर मतदान सुरु आहे. या दरम्यान शिंदे गटाकडून बोगस मतदान करण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-मापाडी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार, देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे यांनी केला. यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. उमेदवारांनी थेट मतदान केंद्रात जावून राडा घातला. तसेच मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या वादात मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला. 

दरम्यान, जळगाव बाजार समितीसाठी जळगाव शहरासह कानळदा, सावखेडा, उमाळा व वावडदा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होते.
 

Web Title: Bogus voting at Jalgaon Center for Jalgaon Agricultural Produce Market Committee? Objections by candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव