बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत वाटपास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:53 AM2018-06-26T00:53:25+5:302018-06-26T00:53:52+5:30
प्रतीक्षा किती : ज्यांनी बँक खाते क्रमांक दिले त्यांना तरी अनुदान तातडीने देण्याची गरज
चोपडा, जि.जळगाव : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटपास दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना प्रथमच मोठी मदत प्राप्त झाली आहे. कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकºयांना जिरायती व बागायती अशा दोन विभागात शासन निदेशानुसार मदत दिली जाणार असून, तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांसाठी एकूण ३४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे. पहिला हप्ता नऊ कोटी रुपये तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र हे पैसे येण्यास जवळपास एक महिन्याच्या कालावधी लोटला तरी शेतकºयांना वाटप होत नाही, वाटपास दिरंगाई होत आहे.
अशी मिळणार मदत
चोपडा तालुक्यात कृषी सहायक तसेच महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकºयाना मदत देण्याबाबत तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे याद्या लवकरात लवकर द्यावयाच्या आहेत. याद्या आल्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे हे शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहेत.
बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकºयांना जिरायती क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, तर बागायती क्षेत्रात १३ हजार ५०० रुपयाची मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरी मदत दिली जाणार आहे.
शेतकºयांचा खरीप २०१७ मध्ये सातबाºयावर कापूस नोंद असणे आवश्यक आहे. तसेच बागायती व जिरायती असा उल्लेख असणे आवश्यक आहे. बाधित शेतकºयाच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४४३ कोटी १९ लाख ४७ हजार रुपये रक्कम मंजूर असून, पहिला हप्ता जिह्याला ११८ कोटी १९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात सर्वाधिक जामनेर, चाळीसगाव व नंतर चोपडा तालुक्याला ३३ कोटी रुपये बोंडअळीबाबत मदत जाहीर झाली आहे. अन्य तालुके त्या तुलनेत मागे आहेत.
बोंडअळीच्या नुकसानीनंतर मदतीची रक्कम प्रशासनाकडे आलेली आहे. परंतु अनेक शेतकºयांची बँक खाती नंबर प्रशासनाकडे नाहीत. परिणामी अनुदान वाटपाचे काम रखडले आहे. यात ज्या शेतकºयांनी बँक खाती क्रमांक दिलेले आहेत, त्यांनाही अनुदान मदत मिळालेली नाही. किमान त्यांना तरी मदत तातडीने द्यावी, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.