जळगाव जिल्ह्यात २२ गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:01 PM2018-07-25T13:01:15+5:302018-07-25T13:02:40+5:30

उपाययोजना सुरू

Bollworm incidence in 22 villages in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात २२ गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव

जळगाव जिल्ह्यात २२ गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देअनुदान वाटपाची मागणी जिल्हाधिका-यांकडून बोंडअळीच्या परिस्थितीबाबत आढावा

जळगाव : गेल्यावर्षी जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अद्याप पूर्ण मिळालेली नसतानाच यंदाही कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने क्रॉपसॅप योजनेंतर्गत पाहणी केलेल्या जिल्ह्यातील २२ गावांमध्ये बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या गावांमध्ये कृषी विभागाकडून लिंबोळीचा अर्क तसेच केमीकल स्प्रे फवारण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच जनजागृतीही केली जात आहे.
यावल तालुक्यातील १ गाव, जळगाव १, रावेर १, मुक्ताईनगर २, अमळनेर ७, पारोळा १, धरणगाव ३, एरंडोल ४, पाचोरा १, भडगाव १, चाळीसगाव तालुक्यातील १ गावात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांकडून बोंडअळीच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला.
डॉ.सतीश पाटील यांची अनुदान वाटपाची मागणी
एरंडोल, पारोळा तालुक्यातील शेतकºयांना अद्याप बोंडअळी अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. या शेतकºयांना त्वरीत अनुदान वाटप करण्याची मागणी राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसेच ज्यांच्या ७/१२वर कपाशीची नोंद आहे, असे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांचाही समावेश नुकसान भरपाईच्या यादीत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Bollworm incidence in 22 villages in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.