जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब सापडला...कर्मचाºयांची धावपळ...आगही लागली...अखेर सगळे सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:10 PM2017-10-13T22:10:28+5:302017-10-13T22:11:51+5:30

मॉकड्रिल: ४० प्रशिक्षीत स्वयंसेवकांनी दाखविले प्रात्यक्षिक

Bomb found in the collector's office ... the staff ran ... finally everything went smoothly | जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब सापडला...कर्मचाºयांची धावपळ...आगही लागली...अखेर सगळे सुरळीत

जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब सापडला...कर्मचाºयांची धावपळ...आगही लागली...अखेर सगळे सुरळीत

Next
ठळक मुद्दे आपत्कालीन जिन्याने जिल्हाधिकारी उतरले खालीबॉम्ब केला निकामीजखमी व्यक्तीला रोपलँडरच्या सहाय्याने उतरविले खाली

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१३ - दुपारी तीन वाजेची वेळ...स्फोटाचा मोठा आवाज.. बॉम्बस्फोटामुळे मोठी आग लागलीय... घाबरलेल्या अवस्थेत आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचा कर्मचारी ‘जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बाँबस्फोट झाल्याची’ माहिती देतो. अन् सर्व संबंधीत यंत्रणेची धावपळ सुरू होते. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वजण सुस्कारा सोडतात. कारण ते असते ‘मॉकड्रील’.
दुपारी ठिक तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सायरनच्या आवाज होतो. सायरनमुळे सर्व शाखांमधील महिला व पुरुष अधिकारी, कर्मचारी यांना धोक्याचा इशारा देण्यात येतो. धोक्याचा इशारा मिळताच  सर्व कर्मचारी आपले कामकाज थांबवून, संगणक बंद करुन व शाखेतील विद्युत उपकरणे बंद करुन कार्यालयाच्या बाहेर पडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मोकळया जागेत एकत्र जमा होतात.  दुपारी तीन वाजून ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बचाव कार्यासाठी पोलीस अधिक्षक, पोलीस नियंत्रण कक्षातील बॉम्ब शोधक व बॉम्ब विनाशक पथक तसेच जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव आॅर्डिनन्स फॅक्टरी,  दीपनगर येथील अग्निशमन पथकाच्या गाडया तसेच बचावासाठी जिल्ह्यातील होमगार्ड पथक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०८ क्रमांकाची अ‍ॅम्बुलन्स, रेडक्रॉस सोसायटीची रक्तदान व्हॅन, वैद्यकीय सुविधा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या.
बॉम्ब केला निकामी
दुपारी ३. ३५ वाजता बॉम्ब शोध व विनाशक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन पोर्चमध्ये ठेवलेला बॉम्ब शोधून त्याला निकामी केला.
आपत्कालीन जिन्याने जिल्हाधिकारी उतरले खाली
तीन वाजून ४० मिनिटांनी  छतावर लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असतानाच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे इमारतीच्या पाठीमागील बाजूने आपत्कालीन जिन्याने सुखरुप खाली आले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील पोर्चचे वरील दुसºया मजल्यावरुन जखमी व्यक्तीला रोपलँडरच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तीजनक परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचे याचे मॉकड्रिल पार पडले.
 सर्वांनी आपली कामगिरी चोख पार पाडल्याबदद्ल जिल्हाधिकारी  सर्वांचे अभिनंदन करीत असतानाच अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातील एका चिंचेच्या झाडावर साप आढळला. त्यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी स्नेकस्टिकच्या सहाय्याने सापाला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम केले. अशाप्रकारे हे मॉकड्रील पार पडले. त्यासाठी अर्जुना बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Bomb found in the collector's office ... the staff ran ... finally everything went smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.