व:हाडाचा ट्रक कलंडला, बालकाचा मृत्यू

By admin | Published: February 13, 2017 12:51 AM2017-02-13T00:51:04+5:302017-02-13T00:51:04+5:30

कुंभारखेडा-सावखेडादरम्यान अपघात : ट्रकचा एक्सल तुटला, जखमी 30 व:हाडींवर फैजपूर येथे उपचार

A: Bone truck clink, child's death | व:हाडाचा ट्रक कलंडला, बालकाचा मृत्यू

व:हाडाचा ट्रक कलंडला, बालकाचा मृत्यू

Next

फैजपूर : लोहारा येथून मोहरद, ता.यावल येथे साखरपुडय़ासाठी जाणा:या व:हाडाच्या ट्रकचा एक्सल तुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला खड्डय़ात उतरुन झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एक 12 वर्षीय मुलांचा जागीच अंत झाला तर 25 ते 30 व:हाडी जखमी झाले. हा अपघात रविवारी कुंभारखेडा-सावखेडा रस्त्यावर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान झाला़
जखमींमध्ये वृद्ध महिला व लहान मुलांचा समावेश आहे तर ठार झालेल्या मुलाचे नाव समीर अफजल तडवी (वय 12, रा.पाल) असे आहे. गेल्या दोन दिवसातील व:हाडीच्या वाहनाला अपघात होण्याची ही दुसरी घटना असल्याने तडवी समाजावर शोककळा पसरली आहे.
लोहारा येथील मेहमूद सुभान तडवी यांचा मुलगा भिकारी याच्या साखरपुडय़ासाठी व:हाड घेऊन ट्रक मोहरद, ता.यावल येथे जात असताना कुंभारखेडा-सावखेडा दरम्यान ट्रकचा एक्सल तुटल्याने भरधाव ट्रक (एमसीसी 1261) हा सरळ रस्त्याच्या कडेला खड्डय़ात जाऊन एका झाडावर आदळला. या ट्रकमध्ये मोठय़ा प्रमाणावर वृद्ध महिला, लहान मुले-मुलींचा समावेश होता़
अपघात होताच व:हाडींमध्ये प्रचंड आक्रोश झाला. अपघाताचे वृत्त समजताच सावखेडा, कुंभारखेडा, चिनावल येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने फैजपूर येथील डॉ.शैलेंद्र खाचणे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात 12 वर्षीय समीर अफजल तडवी या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर 25 ते 30 जखमींवर डॉ.शैलेंद्र खाचणे, डॉॅ.भरत महाजन यांनी तातडीने उपचार केले. तसेच गंभीर असलेल्या गुरमतबाई दगू तडवी यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली तर आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेऊन चौकशी केली.
सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रामलाल, हवालदार अरुण जाधव, ज्ञानेश्वर चौधरी यांनी रुग्णालयात जखमींना मदत केली. अपघातप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील जखमी असे
रबीया तुकडू तडवी (45), सानीया अरमान तडवी (12), रेहाना अय्यूब तडवी (8), संजय सुलेमान तडवी, सलीम अशफर तडवी (29), जुबेदा हसन तडवी, सुगराबी अहमद तडवी, मयूर मेहबूब तडवी (27), शकीना उखडरू तडवी (30), गुड्डीबाई अहमद तडवी, सुगराबाई जुम्मा तडवी (45), शाहनूर सुबा तडवी (65), अलिशान सकावत तडवी, सबनूर सलदार तडवी, अफजल इमान तडवी (6), मुस्कान सुपडू तडवी, अफजल सलीम तडवी (26), शकीना शकीला रसूल तडवी, मैलुउद्दीन सलाउद्दीन तडवी (6), सुबेदा अहमद तडवी, तबस्सूम तडवी, अफशान जमा तडवी (35), तब्बसूम उस्मान तडवी (3), राणी अरमान तडवी (8), मेहमुदा जुम्मा तडवी (55), खातून जुम्मा तडवी (55), हुरमत दगडू तडवी (65), कुलसुमबाई तडवी (40), शरीफा तडवी, हनीफा तडवी (सर्व रा.लोहारा, ता.रावेर). दरम्यान, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़  (वार्ताहर)
व:हाडाच्या वाहनाचा दुसरा अपघात
4दोन दिवसांपूर्वी 9 रोजी मोरव्हाल ता.रावेर येथून लगAकार्य आटोपून येत असलेल्या व:हाडाच्या चारचाकीला अपघात होऊन ती सरळ दरीत कोसळली होती. त्यात वड्री.ता.यावल येथील उपसरपंच ईस्माईल तडवी ठार झाले होते तर 15 जण जखमी झाले होते. त्यांनतर 12 रोजी पुन्हा साखरपुडय़ासाठी जाणा:या व:हाडाच्या ट्रकला अपघात झाला, त्यात 12 वर्षीय समीरला आपला जीव गमवावा लागला तर 30 च्या जवळपास जखमी झाले. दोन्ही अपघात हे तडवी आदिवासी समाजाच्या व:हाडाला झाल्याने शोककळा पसरली आहे. त्यात समीर हा एकुलता एक मुलगा होता.
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
4अपघातप्रकरणी ईकबाल रमजान तडवी (लोहारा) यांनी मालट्रकवरील चालक (नाव, गाव माहीत नाही) याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुरनं़9/17, भादंवि 304 अ, 279, 337, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब, 66/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ चालकाने भरधाव वाहन चालवून वळणावर ट्रक पलटी केला तसेच पोलिसात खबर न देता निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आह़े

Web Title: A: Bone truck clink, child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.