वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी भुसावळात बुक बँक

By Admin | Published: April 25, 2017 12:37 PM2017-04-25T12:37:20+5:302017-04-25T12:37:20+5:30

पुस्तक वाचनाची गोडी वाढावी, लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रूजावी, वाचनातून ज्ञानसमृद्धी व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Book Bank in the background for reading culture | वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी भुसावळात बुक बँक

वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी भुसावळात बुक बँक

googlenewsNext

 भुसावळ,दि.25- आपल्याकडे उपलब्ध असलेली पुस्तके जमा करण्याचे जागर प्रतिष्ठानने आवाहन केले आह़े ती पुस्तके वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. हा उपक्रम बुक बँक म्हणून असेल.

पुस्तक वाचनाची गोडी वाढावी, लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रूजावी, वाचनातून ज्ञानसमृद्धी व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अनेकवेळा वाचलेली पुस्तके घरात अडगळीत पडून राहतात अथवा वाचन झाल्यावर पुस्तकांकडे दुर्लक्ष होत़े अशा वेळी ही पुस्तके इतरांना उपयोगी पडावी, यासाठी बुक बँक हा उपक्रम राबविण्याचे जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी कळवले आह़े 
त्या अंतर्गत वाढदिवस, दिनविशेष, स्मृतीप्रित्यर्थ, जुनी पुस्तके, जीर्ण झालेली परंतु वाचन उपयोगी पुस्तके बुक बँकमध्ये जमा करता येणार आहे. अधिक माहितीसाठी राजपथ क्लासेस, तिसरा मजला, साई प्लाझा, जामनेर रोड, भुसावळ 9860601636 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा.नीलेश गुरूचल, कोषाध्यक्ष प्रा.ऋषीकेश पवार, अॅड.हरेशकुमार पाटील, तज्ञ मार्गदर्शक डॉ.जगदीश पाटील, संचालक गोकूळ सोनवणे, पवन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Book Bank in the background for reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.