‘हमालपुरा ते कुलगुरू’ पुस्तकातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:06+5:302021-03-16T04:17:06+5:30
फोटो - १६ सीटीआर ०२ आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला ...
फोटो - १६ सीटीआर ०२
आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला अन् तीच माझी पहिली भेट...हळूहळू त्यांना कार्यक्रमात बोलवू लागलो... मैत्री घट्ट होत गेली...आणि त्यातून समोर आला, त्यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अन् तो आपण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ या पुस्तकातून सर्वांसमोर उलगडला. त्यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासातून सर्वांनाच चांगली प्रेरणा मिळाल्याची भावना सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त करीत माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सोमवारी नागपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर मेश्राम यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यातच डॉ. मिलिंद बागुल यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सन २०११ मध्ये मेश्रामांनी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा स्वागताला गेलो ती त्यांच्या सोबतची आपली पहिली भेट. त्यानंतर एका पुस्तक प्रकाशनाला त्यांना बोलविले. हळूहळू ओळख वाढत गेली, मैत्री घट्ट होत गेली. एका दिवशी चर्चेतून त्यांनी संपूर्ण जीवन प्रवास आपल्याजवळ उलगडला अन् तो युवापिढीला प्रेरणा ठरणारा होता. म्हणून तो पुस्तकातून सर्वांसमोर यावा, हे आपण त्यांना सांगितले. वर्षभराच्या मेहनतीनंतर संपूर्ण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ हा प्रा.डॉ. सुधीर मेश्रामांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणारा पुस्तक लिहिले. सन २०१५ मध्ये त्यांच्याच हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तो क्षण अविस्मरणीय असल्याची भावना डॉ. मिलिंद बागुल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. माजी कुलगुरू यांनी हमालपुरा या झोपडपट्टी भागात राहून घेतलेले शिक्षण...त्यांची ध्येय गाठण्याची जिद्द...प्राथमिक शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण कसे घेतले... विद्यापीठात केलेले संशोधन, देशपातळीवर पोहोचलेले उपक्रम, सामंजस्य करार, अ श्रेणीसाठी नॅक समितीला दिलेले आव्हान...यासह शिस्तप्रिय कुलगुरुपर्यंतचा संपूर्ण प्रवास पुस्तकातून उलगडल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले. मेश्राम यांचा दोनशेपेक्षा अधिक संघटनांकडून गौरव झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राध्यापक असण्याबरोबरच ते संशोधक होते. विद्यापीठाचा विकास कसा साधता येईल, यासाठी त्यांच्या असणाऱ्या कारकिर्दीत प्रयत्नशील होते. त्यांच्या व्यक्तीश: असणाऱ्या संबंधांमुळे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त झाले. एक स्वतंत्र ओळख म्हणून या विद्यापीठाला एक चांगला दर्जा प्राप्त झाला़ एक सच्चा शिक्षणतज्ज्ञ गमावल्याचे खूप मोठे दु:ख शिक्षण क्षेत्रावर कोसळले आहे. त्यांना विनम्र आदरांजली.
- डॉ. मिलिंद बागुल, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी साहित्य परिषद