कोरोनामुळे फटका : वह्या पुस्तक विक्री ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:24 PM2020-07-23T15:24:03+5:302020-07-23T15:26:33+5:30

यावर्षी शाळा केव्हा सुरू होणार याची शाश्वती नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरविल्याने पुस्तक विक्रेत्यांचाही संपूर्ण व्यवहारच ठप्प झाला आहे.

Book sales halted | कोरोनामुळे फटका : वह्या पुस्तक विक्री ठप्प

कोरोनामुळे फटका : वह्या पुस्तक विक्री ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांनी बदलवला व्यवसायअनेकांपुढे निर्माण झालाय रोजगाराचा प्रश्नदुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल भरावे कसे?

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : दरवर्षी जून व जुलै महिन्यात वह्या-पुस्तकाची दुकाने गर्दीने फुलतात. यंदा मात्र दुकाने सुनीसुनी आहेत. कोरोनामुळे सर्वात जास्त फटका वह्या पुस्तक विक्रेत्यांना बसला असून, लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी शाळा केव्हा सुरू होणार याची शाश्वती नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरविल्याने पुस्तक विक्रेत्यांचाही संपूर्ण व्यवहारच ठप्प झाला आहे.
तालुक्यात वह्या पुस्तक, जनरल स्टोअर्सची अनेक दुकाने आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी लाखोंची उलाढाल होते. विद्यार्थी व पालक पुस्तकांसोबतच रजिस्टर, पेन, पेन्सील, स्कूलबॅग, शालेय गणवेश, बूट खरेदी करतात. जून व जुलै महिन्यात या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असते. संपूर्ण वर्षभरात या दोन महिन्यातच या व्यावसायिकांचा सर्वात जास्त व्यवसाय होतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला आहे. अनेक छोटे व्यापारी दुकानांचे भाडेही देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू वगळता बहुतांश दुकाने सुरू झाली. मात्र, त्याचा पुस्तक विक्रेत्यांची दुकाने सुरू झाली असली तरी त्यांना काहीच फायदा झाला नाही. अशा परिस्थितीतही व्यापारी आपली दुकाने चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बँकेचे कर्ज, दुकान भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण झाले आहे. व्यापाºयांनी सांगितले की, कोरोना आणखी किती दिवस राहील यावर पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय अवलंबून आहे.

पुस्तक विक्रेत्यांनी व्यवसाय बदलला
पुस्तकांची विक्री यावर्षी होणार नाही, याची शाश्वती व्यावसायिकांना आल्याने अनेकांनी पुस्तकांच्या दुकानामध्ये सॅनिटायझर, मास्क विक्री सुरू केली आहे, तर काहींनी जनरल स्टोअर्स सुरू केले आहे. काहींनी गृहोपयोगी प्लॅस्टिक साहित्य विक्री तर ग्रामीण भागात अनेक दुकानदारांनी पॅकिंग खाद्य विक्री सुरू केली आहे. शहरातील एका वह्या पुस्तक आणि जनरल स्टोअर्स चालकाने भाजीपाला विक्री सुरू केली आहे.

आॅनलाईन शिक्षण
दुसरीकडे काही शाळांनी व्हॉट्सएपच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अवघ्या दोन ते चार टक्के विद्यार्थी पुस्तक मागणी करीत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे प्रकाशक आणि शहरातील पुस्तकांचे डीलर यांची प्रतिष्ठाने बंद आहेत. पाठोपाठ ट्रान्सपोर्टही होत नाही म्हणून तुरळक पुस्तक मागणीही पूर्ण होऊ शकत नाही.

एकही वही विकली नाही
वही विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल करणाºया जनरल स्टोअर्स आणि वह्या पुस्तक विक्रेत्यांची यंदा एक वहीदेखील विक्री झाली नाही. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. अधिकतर वह्या विक्रेत्यांनी मार्च अगोदर माल भरून ठेवला होता. अशा परिस्थितीत वह्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु ग्राहक नाही. आॅनलाईन शिक्षण तर सुरू आहे मात्र त्याला वह्यांचा वापर नसल्याने वह्या खरेदी करणारे नाहीत.

तालुक्यात १२ पुस्तक विक्री करणारी दुकाने आहेत. कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. परिणामी वह्या पुस्तक दप्तर विक्री ग्राहक नसल्याने ठप्प आहे. अनेक जनरल स्टोअर्स व वह्या पुस्तक विक्रेत्यांवर संकट आहे. अशात काही दुकानदारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय बदलविला आहे.
-संग्राम पाटील, पुस्तक विक्रेते, मुक्ताईनगर

Web Title: Book sales halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.