भाजपवर सट्टा लावणारे ‘बुकी’ मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:52 AM2019-05-25T11:52:52+5:302019-05-25T11:53:21+5:30

जळगावच्या लढतीमुळे अनेकांचे नुकसान

The bookie 'Malakal' who betrayed the BJP | भाजपवर सट्टा लावणारे ‘बुकी’ मालामाल

भाजपवर सट्टा लावणारे ‘बुकी’ मालामाल

Next

जळगाव: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत भाजपाला घवघवीत यश मिळाले असून, यामुळे भाजपा उमेदवारांवर सट्टा लावणाऱ्या ‘बुकीं’ची दिवाळी झाली आहे. जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेच्या जागांवर कोट्यवधीचा सट्टा लावला होता. यामध्ये दोन्ही जागा भाजपाने जिंकल्यामुळे भाजपावर सट्टा लावणारे मालामाल झाले आहेत.
रावेर व जळगाव लोकसभेच्या दोन्ही जागांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला.रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांनाच बुकींची पसंती होती.त्यामुळे खडसे यांच्या विजयावर सर्वात कमी बोली २५ ते ३५ पैसे इतका भाव होता. तर डॉ.उल्हास पाटील यांच्यावर १ ते २ रुपयांपर्यंतचा भाव होता. त्यामुळे सट्टा बाजाराची पसंती खडसे यांनाच होती. त्यानुसारच निकाल लागल्यामुळे ज्यांनी खडसे यांच्या विजयावर बोली लावली त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. तर डॉ.पाटील यांच्यावर बोली लावणाऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसला आहे.
जळगाव लोकसभेच्या संभ्रमात अनेकांचे नुकसान
रावेर येथील लढत बुकींच्या मते एकतर्फी होईल असे अंदाज व्यक्त करण्यात आले. तर जळगाव लोकसभा मतदारसंघाची लढत ही काट्याची होण्याचा अंदाज बुकींकडून वर्तविला जात होता. त्यामुळे सट्टा बाजारात उन्मेश पाटील यांच्या विजयाबाबत २५ ते ३५ पैसे तर गुलाबराव देवकर यांच्यावर ४० ते ५० पैसे इतका भाव होता. मतमोजणीच्या काही दिवसाआधी देवकर यांच्यावरील भाव १ ते २ रुपयांपर्यंत आला असला तरी अनेकांनी मतदानानंतर व मतदानाआधी देवकर यांच्यावरच जास्त बोली लावली होती. त्यामुळे जळगाव मतदार संघाचा निकाल अनपेक्षितपणे एकतर्फी लागल्याने बुकींचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
पैजा लावणाºयांची ‘कही खुशी, कही गम’
मोदी समर्थक व विरोधक अशा फरकातच ही निवडणूक लढली गेली. अनेकांच्या मते यंदा मोदींचे सरकार बसणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तर काहीजण मोठ्या ठामपणे सत्ता येईलच असे सांगत होते. यामुळे अनेकांनी देशात मोदींचे सरकार येईल की नाही ?,राज्यात किती जागा मिळतील ?, रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय होईल ग्रामीण भागासह शहरातदेखील पैजा लावण्यात आल्या होत्या. ज्यांनी भाजपाच्या बाजूने पैज लावली होती. त्यांची या निकालामुळे लॉटरी लागली आहे.

Web Title: The bookie 'Malakal' who betrayed the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव