शिक्षणाचे धडे देणाऱ्या गालापूर शाळेच्या उपक्रमाचा पुस्तिकेत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:44 PM2020-11-22T14:44:26+5:302020-11-22T14:44:39+5:30
तालुक्यातील गालापूर शाळेच्या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.
एरंडोल : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असलेल्या ' आपला जिल्हा आपले उपक्रम ' भाग ४ या डिजिटल स्वरूपात पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपसंचालक नितीन उपासनी यांच्याहस्ते करण्यात आले. यात तालुक्यातील गालापूर शाळेच्या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.
पुस्तिकेत सर्वोत्कृष्ट उपक्रमांची या पुस्तकात नोंद करण्यात आली. या पुस्तिकेत एरंडोल तालुक्यात कठीण अशा कोरोना काळात शिक्षण सुरू राहण्यासाठी आदिवासी वाड्या वस्त्यावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अंगणात शिक्षणाचे धडे देणारा ' घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी' हा प्रयोग राबविण्यात आला. ऑनलाईन शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी राज्यात अनुकरणीय प्रयोग सर्वांना देणारे एरंडोल तालुक्यातील आदर्श शिक्षक दाम्पत्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक गालापूर केंद्र उत्राण शाळेच्या प्रयोगशील आदर्श शिक्षिका तथा तेजस प्रकल्पाच्या टॅग कॉर्डिनेटर जयश्री पुरुषोत्तम पाटील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर शाळेचे व राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या उपक्रमाचा जिल्हा परिषद जळगाव शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रकाशित केलेल्या आपला जिल्हा आपले उपक्रम पुस्तिकेत समावेश करण्यात आला आहे. याबद्दल या शिक्षक दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.