परप्रांतीय मजुरांना मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:54+5:302020-12-16T04:31:54+5:30

फोटो आहे जळगाव : अमृत योजनेच्या कामासाठी शहरात आलेल्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ नये यासाठी सेवाधर्म संस्थेच्यावतीने मजूर व ...

Boredom of love to foreign workers | परप्रांतीय मजुरांना मायेची ऊब

परप्रांतीय मजुरांना मायेची ऊब

Next

फोटो आहे

जळगाव : अमृत योजनेच्या कामासाठी शहरात आलेल्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ नये यासाठी सेवाधर्म संस्थेच्यावतीने मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना ऊबदार कपड्याचे वाटप करून मायेची ऊब दिली.

शहरात सध्या सर्वत्र अमृत योजनेची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून यासाठी सात राज्यातून हजारांच्यावर मजूर खोदकाम करण्यासाठी आले आहेत. जळगावकरांच्या सोयीसुविधेसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हा मजूर वर्ग रस्त्यावर खोदकाम करून आपली उपजीविका भागवित आहे. या कामात केवळ पुरुषच नव्हे महिलाही मोठ्या संख्येने सहभागी असून, त्यांच्यासोबत लहान मुलेही जळगावात आले आहेत. सध्या संपूर्ण राज्यभर थंडीची लाट पसरली असताना हा मजूर वर्ग मात्र रात्रीच्या वेळेस आपल्याला लहानग्या मुलांसह उघड्यावर वास्तव्य करून आहे.

थंडीत मजुरांची होणारी अडचण पाहता सेवाधर्म संस्थेच्यावतीने ३०० मजुरांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी नव्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखर नेवे, सेवारथ परिवाराचे डॉ. रितेश पाटील, पंचरत्न फाउंडेशनच्या वैशाली पाटील, गुजराती मंडळाच्या भावना चव्हाण, जिंदगी फाउंडेशनच्या सुषमा भालेराव, अजय पाटील, महेश शिंपी, सारंग नेवे, दीपेश फिरके आदी उपस्थिती होते. रमेशकुमार मुनोत यांनी सहकार्य केले. डॉ. नीलिमा सेठिया, आरोही नेवे यांनी प्रयत्न केले.

हजारांच्या पुढे असलेली मजुरांची संख्या पाहता अजूनही या मजुरांना मदतीची आवश्यकता असल्याने दात्यांनी या मजुरांना ऊबदार कपडे दान करावे, ज्यांना प्रत्यक्ष दान करणे शक्य होणार नसेल त्यांनी सेवाधर्म संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रशेखर नेवे यांनी केले आहे.

Web Title: Boredom of love to foreign workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.