बोदवड तालुक्यातील वराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 07:05 PM2019-02-03T19:05:19+5:302019-02-03T19:07:27+5:30
पत्नीचे निधन झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या निनाजी पांडू सुरवाडे (६५) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.बोदवड येथे शुक्रवारी रात्री घडली.
बोदवड, जि.जळगाव : पत्नीचे निधन झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या निनाजी पांडू सुरवाडे (६५) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.बोदवड येथे शुक्रवारी रात्री घडली.
निनाजी सुरवाडे यांच्या पत्नीचे गेल्या आठवड्यात आजाराने निधन झाले होते. यातच त्यांच्यावर सोसायटीचे एक लाखापर्यंत, तर इतर २० हजारावर कर्ज होते. यामुळे उद्विग्न झालेल्या निनाजी सुरवाडे यांनी शुक्रवारी रात्री स्वत:च्या शेतात जावून विषारी द्रव सेवन केला. ते घरी आल्यानंतर तोंडातून फेस येऊ लागला. यामुळे त्यांच्या मुलाने त्याला दवाखान्यात आणले. तेथून जळगाव येथे रुग्णालयात उपचारार्थ हलवले. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे.