गोळीबार प्रकरणात दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:53+5:302021-04-19T04:14:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल रोजी घडली होती. या गुन्ह्यात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. विक्रम राजू सारवान (३२) व हेमंत विनोद घुसर (३०,दोन्ही रा. गुरुनानकनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
चौघुले प्लॉट येथे व्हॉटस्ॲपवर चिथावणीखोर स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरून वाद उफाळून सारवान व शिंदे या दोन गटांत वाद झाला होता. या गुन्ह्यात सोनू सारवान, नीलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. नंतर बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित विजय जयवंत शिंदे, राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे तिघे या तिघांना अटक केली होती. तसेच संशयित विजय शिंदे याच्याकडून गुन्ह्यात गोळीबारासाठी वापरण्यात आलेले दोन्ही गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शनिवारी रात्री या प्रकरणात विक्रम सारवान व हेमंत घुसर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.