दोन्ही काँग्रेसचा फॉम्यरुला 23 रोजी ठरणार

By admin | Published: January 22, 2017 12:35 AM2017-01-22T00:35:32+5:302017-01-22T00:35:32+5:30

आघाडीची संयुक्त बैठक : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांअभावी चर्चा अपूर्ण

Both the Congress formula will be held on 23rd | दोन्ही काँग्रेसचा फॉम्यरुला 23 रोजी ठरणार

दोन्ही काँग्रेसचा फॉम्यरुला 23 रोजी ठरणार

Next


जळगाव : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी करून आपापल्या पक्ष चिन्हावर जि.प. व पं.स.च्या निवडणुका लढतील. ज्या गट व गणात ज्या पक्षाचा उमेदवार मागील निवडणुकीत आघाडीवर होता तो गट व गण ताकद असलेल्या पक्षाला सोडला जाईल. तसेच जागा              वाटपाचा निर्णय 23 रोजीच्या संयुक्त बैठकीत ठरेल, असा निर्णय शनिवारी दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत झाला.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, अॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, डी.जी.पाटील, विकास पवार आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांअभावी चार तालुक्यांची चर्चा अपूर्ण
काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अॅड.ललिता पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे बैठकीत यावल, रावेर, अमळनेर व चोपडा या तालुक्यांबाबत सविस्तर चर्चा झाली नाही. पण इतर तालुक्यांमध्ये कुणाची किती ताकद, सद्य:स्थिती याबाबत चर्चा झाली, अशी माहिती डॉ.सतीश पाटील व अॅड.संदीप पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
पक्ष चिन्हावर लढणार
आघाडी झाली, पण दोन्ही पक्ष संबंधित गट व गणांची निवडणूक आपापल्या निवडणूक चिन्हांवर लढतील. फक्त जेथे ज्या                         पक्षाची ताकद आहे ती जागा संबंधित पक्षाला मिळेल. त्या गटात,                       गणात मित्र पक्षाचा उमेदवार                    दिला जाणार नाही, हे                        निश्चित झाल्याचे आमदार डॉ.पाटील म्हणाले.
पुन्हा चर्चा करणार
येत्या 23 रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दोन्ही काँग्रेसची पुन्हा संयुक्त बैठक होणार आहे. त्यात कुठल्या पक्षाला किती जागा सुटतील हा फॉम्यरुला निश्चित होईल. जागावाटप निश्चितीनंतर दोन्ही पक्ष आपापले उमेदवार जाहीर करणार असल्याचे डॉ.सतीश पाटील म्हणाले.

Web Title: Both the Congress formula will be held on 23rd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.