दोनही आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क... आम्हाला त्या आठवणींचा प्रचंड अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:36+5:302021-04-14T04:14:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली ...

Both grandfathers' contact with Babasaheb ... We are very proud of those memories | दोनही आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क... आम्हाला त्या आठवणींचा प्रचंड अभिमान

दोनही आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क... आम्हाला त्या आठवणींचा प्रचंड अभिमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली होती. यावेळी त्यांचे स्वागत करणारे आमचे आजोबा दगाजी पाटील, दुसरीकडे वाघाडी, ता. शिरपूर येथील आईचे वडील जहांगीरदार पवार यांचा एका खटल्यानिमत्त बाबासाहेबांशी संपर्क आला. आमच्या नातेवाइकांकडून या आठवणी ऐकल्या आहेत. आज या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, अशा भावना मूळचे आसोदा येथील रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक असलेले प्रकाश भास्करराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रकाश पाटील वय ६७ हे गेल्या ५० वर्षांपासून धुळे येथे अभियंता म्हणून स्थायिक आहेत. त्यांचे मूळ गाव हे आसोदा, ता. जळगाव. या गावातील दगा मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले दगाजी श्यामराव पाटील हे त्यांचे आजोबा व त्यांच्या आजोबांचे काका दौलतराव पाटील यांनी आसोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले होते. तो क्षण थेट आजोबांकडून ऐकायला मिळाला नाही. आजोबांचे आम्ही लहान असतानाच निधन झाले. मात्र, काका व आजींकडून या ऐतिहासिक आठवणी आम्ही ऐकल्या आहेत. थोर व्यक्तिमत्त्वाशी आमच्या आजोबांचा आलेला संपर्क आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रकाश पाटील सांगतात. शिवाय आसोद्याच्या या ऐतिहासिक भेटीबाबत साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनीही भेटीदरम्यान आपल्याशी चर्चा केल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

शिरपूरच्या खटल्यासंदर्भात संपर्क

वघाडी हे आमच्या आईच्या वडिलांचे गाव. जहांगीरदार पवार. वाघाडी येथील आमच्या मामांकडून ऐकल्यानुसार बैलपोळ्याच्या एका वादासंदर्भातील खटला लढविण्यासाठी बाबासाहेब धुळे येथे आले होते. त्यावेळी आमच्या आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क आला होता. त्यावेळी मामांनी या आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांना ते कसे घ्यायला गेले होते, कोर्टात खटला कसा चालला, अशा आठवणी ऐकल्यानंतर आजही अगदी डोळ्यासमोरच असल्याचा भास देऊन जातात. धुळे येथील कंवर वकील यांचे पणजोबा यांनी त्यावेळी बाबासाहेबांचे सहायक म्हणून काम पाहिले होते. वकिलपत्रावर त्यांचीही स्वाक्षरी आहे, असेही प्रकाश पाटील यांनी सांगितले.

आजोबा पुरोगामी विचारांचे

आजोबा दगाजी पाटील यांची विचारसरणी ही पुरोगामी हाेती. त्यांनी आमच्या सर्व कुटुंबावर समानतेचे संस्कार केले. जात-पात हा विषयच कधी आमच्यात आला नाही, आम्ही तसा कधी विचारही केला नाही, असेही प्रकाश पाटील सांगतात.

Web Title: Both grandfathers' contact with Babasaheb ... We are very proud of those memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.