प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून ग्रामसेवकासह दोघे निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:16+5:302021-07-09T04:12:16+5:30

संजय दयाराम जाधव हा रस्त्याने जात असताना आरोपी ग्रामसेवक संभाजी बाबूराव जाधव व त्यांच्यासोबतचा बंडू लहू काळे, तसेच एक ...

Both, including a gram sevak, were acquitted of the charge of assault | प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून ग्रामसेवकासह दोघे निर्दोष

प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून ग्रामसेवकासह दोघे निर्दोष

Next

संजय दयाराम जाधव हा रस्त्याने जात असताना आरोपी ग्रामसेवक संभाजी बाबूराव जाधव व त्यांच्यासोबतचा बंडू लहू काळे, तसेच एक अनोळखी इसम या तिघांनी त्याची गाडी थांबवली व ते तिघे त्याला म्हणाले की, तू आमच्या अंगावर गाडी का घातली? या कारणावरून संजय जाधव यास त्याच्या मोटारसायकलवरून खाली ओढले व त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बंडू लहू काळे व त्याचेसाेबतचा अनोळखी इसम या दोघांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि संभाजी जाधव यांनी त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूसारखे तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटात डावे बाजूस भोसकून त्याला गंभीर जखमी केले.

आरोपींतर्फे ॲड. वसंत आर. ढाके यांनी बचावाचे काम केले. त्यांना ॲड. प्रसाद व्ही. ढाके, ॲड. निरंजन ढाके, ॲड. भारती व्ही. ढाके, ॲड. उदय खैरनार, ॲड. श्याम जाधव यांनी सहकार्य केले.

Web Title: Both, including a gram sevak, were acquitted of the charge of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.