खासगी शिकवणी घेताना आढळले दोघे प्राध्यापक
By admin | Published: January 21, 2017 12:40 AM2017-01-21T00:40:15+5:302017-01-21T00:40:15+5:30
चाळीसगाव : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खासगी शिकवणीच्या विरोधात शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
चाळीसगाव : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खासगी शिकवणीच्या विरोधात शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान बंद करण्याची शिफारस गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी शुक्रवारी एका पत्राद्वारे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यामुळे घरी ‘शिकवणीची शाळा’ भरविणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले असून कोतकर महाविद्यालयातील दोघे प्राध्यापक १२ रोजी सकाळी ८ वाजता शिकवणी घेताना आढळले होते.
याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, १२ रोजी कोतकर महाविद्यालयातील प्राध्यापक बी. आर. येवले, अनिल रामसिंग मगर हे सकाळी ८ वाजता खासगी शिकवणी घेत असल्याचे आढळून आले होते. गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी तसेच केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी अचानक भेटी दिल्या असता हा प्रकार आढळून आला. शिकवणी घेताना आढळून आलेल्या प्राध्यापकांनी प्राचार्यांना शिकवणी न घेण्याचे हमीपत्र लिहून दिले आहे.
याबाबत शिक्षण विभागाने प्राध्यापक हे शाळा विभाग सेवाशर्तीचे उल्लंघन करीत असल्याची बाब प्राचार्य व संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली. मात्र यानंतरही शिकवण्या सुरूच होत्या.
यानंतर प्राचार्य यांनी खुलासा सादर करताना महाविद्यालयातील प्राध्यापक शिकवण्या घेत नाही. मात्र तसेच कुणी आढळल्यास आपण कारवाई करावी, असे नमूद केले. त्यानुसार शुक्रवारी २० रोजी शिक्षण विभागाने थेट महाविद्यालयाचे अनुदान बंद करण्याची शिफारस केली.
खासगी शिकवणी विरोधात यापुढेही कडक कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. संस्थाचालक, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी शिक्षकांना सूचना द्याव्यात. दोषींची गय केली जाणार नाही.
-सचिन परदेशी, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव़
महाविद्यालयातील प्राध्यापकांना खासगी शिकवणीस संस्थाचालकांचा विरोध आहे. मात्र यानंतरही शिकवणी घेणारे कुणी आढळले असेल तर शिक्षण विभागाने कारवाई करावी. महाविद्यालयास वेठीस धरूनये. यापूर्वीच महाविद्यालयाने शिक्षण विभागाला लेखी कळविले आहे.
-प्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, कोतकर कनिष्ठ महाविद्यालय़