जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीच्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:29 PM2018-10-10T12:29:06+5:302018-10-10T12:29:57+5:30
जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांची माहिती
जळगाव : लोकसभेच्या दोन्ही जागा या राष्टÑवादी कॉँग्रेसच्याच असून कॉँग्रेसकडून त्याबाबत चुकीचा दावा केला जात असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत लोकसभेच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाबाबत इच्छुकांची चाचपणी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यात काही जणांच्या समर्थकांनी दोन्ही मतदार संघातील इच्छूकांची नावे सांगितली. याप्रश्नी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप पाटील यांनी दोन पैकी लोकसभेची एक जागा कॉँग्रेस लढवेल असे सांगितले होते. याबाबत बोलताना अॅड. रवींद्र पाटील म्हणाले, दोन्ही जागा या राष्टÑवादीकडे आहेत. यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा असल्यास पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे घेतील. दोन्ही जागा लढवाव्यात अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना आहे.
१५ दिवसात दुष्काळाबाबत निर्णय न झाल्यास राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा अॅड.पाटील यांनी दिला.
समन्वयातून जागा वाटप व्हावे : डॉ.चौधरी
समन्वयातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप करावे असे आवाहन कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. येत्या सहा महिन्यात लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढण्याचे संकेतच नव्हे तशी तयारी सुरू केली आहे. या स्थितीत जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही जागांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने दावा केला आहे. याप्रश्नी समन्वयातून निर्णय व्हावा असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे प्राबल्य आहे तर जळगाव लोकसभा मतदार संघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्राबल्य आहे. हे लक्षात घेऊन यात समन्यवरातून तोडगा निघावा अशी अपेक्षा डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली आहे.