अमळनेर येथील खून प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:46 PM2018-05-20T13:46:25+5:302018-05-20T23:44:48+5:30

दोन जणा फरार

Both of them were arrested in Amalner murder case | अमळनेर येथील खून प्रकरणी दोघांना अटक

अमळनेर येथील खून प्रकरणी दोघांना अटक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - अमळनेर शहरातील बोहरी पेट्रोलपंपाचे मालक अली असगर बोहरी उर्फ बाबा बोहरी यांच्या खून प्रकरणाचा 17 दिवसानंतर रविवारी उलगडा झाला़ हा खून चौघांनी केला असून संशयित आरोपी तनवीर शेख मुख्तार सत्तार (वय-23,रा. ख्वॉजानगर, अमळनेर), मुस्तफा शेख मोहम्मद शेख (वय-24,रा. जुना सरकारी दवाखाना मागे, अमळनेर) तसेच तौफिक शेख मुनीर (वय- 23 रा़ गांधलीपुरा, अमळनेर) यांना रविवारी अटक करण्यात आली आह़े मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित कैलास रामकृष्ण नवघरे (रा़ गांधलीपुरा, अमळनेर) हा अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत़ 
पैशांची लूट करण्यासाठी हे चौघे आले असताना बाबा बोहरी यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला असल्याची कबुली तिघांनी दिली आह़े याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे उपस्थित होते.
3 मे रोजी रात्री 11़46 वाजेच्या सुमारास पेट्रोलपंप मालक अली अजगर बोहरी हे पेट्रोलपंपाचा पूर्ण हिशोब घेऊन घराकडे जात असताना  चार मारेक:यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कैलास नवघरे याने त्यांच्यावर गोळी झाडली होती. यानंतर चौघे शहरातच पसार झाले होत़े घटनेनंतर अमळनेर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखापथकाडून मोरक:यांचा शोध सुरू होता़ 
तिघांना केली अटक 
तनवीर शेख मुख्तार सत्तार, मुस्तफा शेख मोहम्मद शेख तसेच तौफिक शेख, कैलास नवघरे या चौघांनी बोहरी यांचा खून केला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी सकाळी कुराडे  व त्यांच्या पथकातील सहाय्यकपोलीसनिरीक्षक विजय होळकर, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, रविंद्र पाटील, शशिकांत पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, नुरूद्दीन शेख, रामचंद्र बोरसे, सुरज पाटील, गफुर तडवी, दर्शन ढाकणे, चंद्रकांत पाटील यांनी अमळनेर गाठत मुस्तफा व तनवीर या दोघांना घरून रात्री अटक केली़ तर रविवारी दुपारी तौफिक यास ओझर येथून पथकाने अटक केली़ तिघांनी गुनंची कबुली दिली आहे.
बाबा बोहरी यांच्याजवळील पैसे लुटीसाठी आले असताना यावेळी त्यांच्यावर गाळी झाडल्याची तिन्ही आरोपींनी कबुली दिली आह़े 3 मे रात्री गुनत वापरलेली एक कार व दोन दुचाकी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केल्या आहेत़ 
खून केल्यानंतर मुस्तफा गर्दीत थांबून साथीदारांना देत होता माहिती
अमळनेर येथील बोहरी पेट्रोलपंपाचे मालक अली असगर हकिमोद्दीन बोहरी उर्फ बाबा बोहरी (वय-50 रा़ स्टेशनरोड, अमळनेर)यांना लुटण्यासाठी आलेल्या चौघांपैकी कैलास नवघरे याने त्यांच्यावर गोळी झाडल्यानंतर ते जखमी झाले होत़े 
 खाजगी रूग्णालयातून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यापासून तर शवविच्छेदनार्पयत खुनातील संशयित मुस्तफा शेख मोहम्मद (वय-24, रा़ जुना सरकारी दवाखाना, अमळनेर) हा गर्दीत थांबून अन्य साथीदारांना मिनीटा-मिनीटाची माहिती देत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितली़ दरम्यान, गोळी झाडणारा सराईत गुन्हेगार कैलास हा तर चक्क ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या छतावर दारूच्या नशेत तर्र्र होऊन झोपलेला असल्याचेही त्यांनी सांगितल़े 
चौघांनी रिचविली दारू 
चारचाकीतून आलेल्या चौघांनी घटनेच्या अर्धा तासापूर्वी उद्यानात बसून दारू रिचविली़ यातील तनवीर, तौफिक व कैलास हे तर्र्र झाले होत़े तर मुस्तफा याने काही प्रमाणत दारू प्राशन केली होती़ दरम्यान, कैलास याने पुन्हा मुस्तफा यास दोनशे रूपये देऊन दारू आणण्यासाठी सांगितले होत़े त्याचवेळी मुस्तफा याने पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने बोहरी यांच्या पेट्रोलपंपावर जावून रेकी केल्याची माहिती पोलिसांनी दिली़  
 

Web Title: Both of them were arrested in Amalner murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.