जळगावला मंडप घ्यायला येणारे दोन्ही दुचाकीस्वार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:00 PM2019-03-23T16:00:51+5:302019-03-23T16:05:22+5:30
जळगाव : जळगाव शहरात वॉशिंगसाठी टाकलेले मंडप घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यात दोन्ही तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता शहापूर, ता.जामनेर गावाजवळ घडली. योगीराज किसन राठोड (३५, रा. घाणेगाव तांडा, ता. सोयगाव) हा जागीच तर श्यामराव विष्णू चव्हाण (१८,रा. घाणेगाव तांडा, ता.सोयगाव) याचा जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्यामराव व योगीराज यांचा मंडपचा व्यवसाय आहे. लग्नसराई सुरु असल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी जळगावात मंडप वॉश्ािंगसाठी टाकलेला होता. हे मंडप घेण्यासाठी दोन्ही जण शनिवारी सकाळी दुचाकीने जळगाव यायला निघाले असता, शहापूर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने योगीराज याचा जागेवरच मृत्यू झाला. तर श्यामराव याला १०८ या शासकीय रुग्णवाहिकेतून रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. रुग्णवाहिकेतील डॉ. जुगल वाडीले व चालक दत्तात्रय पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान, योगीराज याचा मृतदेह जामनेर येथे नेण्यात आला.
नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर योगीराज व श्यामराव यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. योगीराज जामनेर येथे असल्याचे समजल्यावर येथून काही नातेवाईक तेथे गेले. श्यामराव याला रक्तबंबाळ व मृतावस्थेत पाहून एकच आक्रोश केला. शहरातील नातेवाईकांनीही धाव घेतली होती.श्यामराव हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे, तर योगीराज याच्या पश्चात आई धबीबाई, वडील किसन राठोड, पत्नी, मुलगा रोहन व युवराज असा परिवार आहे.